शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सारसून गावातील मखर उत्सवाद्वारे ग्रामदेवतेला दिला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:39 IST

तालुक्यातील सारसून गावात मखर (मुळूटी) उत्सव कार्यक्र म मोठ्या उत्साहात साजरा झाला. मखर उत्सव सारसून गावातील आदिवासींच्या पद्धतीने मखर मुळूट्या उत्सव साजरा जातो.

- हुसेन मेमनजव्हार : तालुक्यातील सारसून गावात मखर (मुळूटी) उत्सव कार्यक्र म मोठ्या उत्साहात साजरा झाला. मखर उत्सव सारसून गावातील आदिवासींच्या पद्धतीने मखर मुळूट्या उत्सव साजरा जातो. या उत्सवासाठी सारसून गावातील आदिवासी नागरिकांनी गेल्या वर्ष भरापासून पाळद पाळून उत्सव साजरा करण्यात आला. हा मखर मुळूटीचा कार्यक्र म दोन दिवस चालला.सारसून गावातील आदिवासी नागरिकांनी आदिवासींच्या पारंपारिक पद्धतीने मखर मुळूटी उत्सव साजरा करण्यासाठी येथील ग्रामस्थ महिनाभरापूर्वी कामाला लागले होते. गावाच्या वेशीवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावण्यासाठी लाकडांमध्ये कोरीव काम करून देवतांच्या मृती घडविण्यात आले होते. या कार्यक्र मासाठी गावामध्ये ग्रामस्थांनी गेल्या वर्षभरापासून पाळद केली होती. तसेच या पाळद दरम्यान संपूर्ण गावात दारू बंदी, गावात भांडण वाद करायचे नाही. तसेच कोणतेही वाद्य वाजवायचे नाही. नवीन आलेलं पीक खायचे नाही. घरातील धान्य विकायचे नाही. कोंबडे, बकरे कापायचे नाही. अशी पाळद प्रथा करण्यात आली. आधुनिक काळातही ही प्रथेचा मान सर्वजण एकदिलाने स्विकारतात.गावकºयांची अशी धारणा आहे की, मखर मुळूटी मुळे गावावर येणारी नैसिर्गक संकटे दूर होतात. पाळद केल्यामुळे आदिवासींना संकटांपासून संरक्षण मिळते. तसेच गावातील रोगराई, गुराढोरांवर येणारी संकटे आणि वर्षभरात येणारे पीक चांगले येतात. या कार्यक्र मासाठी संपूर्ण गावातील नागरिकांनी एकत्र येऊन उत्सव साजरा करण्यासाठी रात्रभर गावाच्या वेशीवर जमून ग्रामस्थांनी घांगळ हे आदिवासींची वाद्य वाजवून आदिवासींच्या प्रथेनुसार देवदेवतांची पूजा, अर्चना करण्यात आली.दुसºया दिवशी आदिवासींच्या प्रथेनुसार बळी द्यावा लागतो. त्याप्रमाणे मेंढे, बकरे आणि कोंबड्यांचा बळी दिला. देवाला मान दिल्यानंतर प्रसाद म्हणून सर्व ग्रामस्थांनी गावाच्या वशीवर सामुहिक जेवण केले. या कार्यक्र माचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्र माच्या दुसºया दिवशी गावामध्ये कोणाच्याही घरी चूल पेटवली जात नाही. आणि गावात कोणाच्याही घरी स्वयंपाक केला जात नाही. तसेच गावकºयांनी वेशीवर मखरांच्या समोरच जेवणावळ करावी अशी प्रथा आजही आदिवासींमध्ये आहे.ग्रामस्थांच्या म्हणीनुसार, मखर मुळूटी हा कार्यक्र म दर ६ वर्षांनी साजरा होतो. अशी माहिती सारसून गावातील पोलीस पाटील मधू जंगली यांनी दिली. मखर उत्सव साजरा करण्यामागील मूळ उद्देश, महत्व व आदिवासी संस्कृती बद्दल माहिती गावातील माजी सरपंच सजन जंगली यांनी लोकमतला दिली.