शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बोटोशीत ‘जिजाऊ’ उभारणार लोखंडी पूल; स्वखर्चातून करणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 00:17 IST

बोटोशी येथील जिजाऊ संस्थेच्या शाखांचे उद्घाटन सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात निलेश सांबरे यांच्या हस्ते या लोखंडी पुलाचे भूमिपूजनदेखील करण्यात आले.

मोखाडा : बोटोशी येथे इतर गावांना जोडणारा पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा संपर्क तुटतो. तसेच पावसाळ्यात येजा करताना अनेक माणसे नदीच्या प्रवाहात वाहूनदेखील गेली आहेत. याची निलेश सांबरे यांनी गंभीरतेने दखल घेऊन बोटोशी येथे जिजाऊ संस्था स्वखर्चातून लोखंडी पूल उभारणार आहे. यामुळे बोटोशी येथील ग्रामस्थ आता चिंतामुक्त झाले आहेत. त्यांना पावसाळ्यात किंवा इतरही काळात इतर गावांत जाण्यासाठी दगदग करावी लागणार नाही.

बोटोशी येथील जिजाऊ संस्थेच्या शाखांचे उद्घाटन सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमात निलेश सांबरे यांच्या हस्ते या लोखंडी पुलाचे भूमिपूजनदेखील करण्यात आले. यावेळी सांबरे यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला. या भागात जातीने लक्ष घालून येथील आदिवासींचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू. बेरोजगार तरुणांना गावातल्या गावात रोजगार उपलब्ध करून देऊ. त्याचबरोबर येथील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन येथून जिल्हाधिकारी, तहसीलदार, मंत्रालयात उच्चपदावर असलेले अधिकारी निर्माण करण्यासाठी जिजाऊ कटिबद्ध राहील. 

आपण समाजाला देणं लागत असतो, या समाजसेवी भावनेतून हे काम अविरतपणे सुरू राहील. तसेच आपल्याशी निगडित कोणतीही समस्या असो, आम्ही सदैव सोडवण्यासाठी तत्पर राहू, असेही सांबरे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हबीबभाई शेख, रविंद्र खुताडे, जावेद खान, रोहित चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

ग्रामस्थ आनंदितआम्ही कुणालाही खिंडार पाडायला आलेलो नाही. येथील आदिवासींचा विकास करायला आलो आहोत. तसेच येथील ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेता बोटोशी येथे पूल उभारणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले. यामुळे येथील गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.

तालुक्यात १८ शाखातालुक्यातील शिरसगाव, सूर्यमाळ, केवनाळे, गमघर, बोटोशी, पाथर्डी-१, पाथर्डी-२, खोडाळा, जोगलवाडी, वाकडपाडा, कोचाळे, किनिस्ते, हट्टीपाडा, कोशिमशेत, शेंड्याची मेट, निकमवाडी, पळसुंडे, चिकाटीपाडा येथील १८ गावांमध्ये जिजाऊ शाखांचे उद्घाटन करण्यात आले.