शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रातील ‘घुसखोर मच्छीमार भगाव’ मोहीम, अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षे धगधगतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:44 IST

पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे.

पालघर : पालघरविरुद्ध वसई, उत्तन मढ-भाटी येथील मच्छीमारांच्या समुद्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ३० वर्षांपासून सतत धगधगता आहे. या ज्वलंत प्रश्नावर उपाययोजना आखण्यात केंद्र तसेच राज्य शासनाकडून उदासीन धोरण स्वीकारले जात आहे. राज्य शासन आणि मत्स्यव्यवसाय विभागाने आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने मुंबई मधील मढ-भाटी भागातील शेकडो मच्छीमार बोटींनीही आमच्या भागात आपल्या कवी मारण्यास घेतल्याने मासेमारी करण्यास जिल्ह्यातील मच्छीमाराना क्षेत्रच उरलेले नसल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगत आपले म्हणणे मांडण्यासाठी संरक्षण समिती अध्यक्ष अशोक आंभिरे, मच्छीमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजन मेहेर, जयप्रकाश मेहेर, सर्वोदय संस्थेचे अध्यक्ष पंकज पाटील, सुभाष तामोरे आदींनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेतली.आमच्या समोरील क्षेत्रातील वाढत्या कवींच्या क्षेत्रामुळे आम्हाला मासेमारी करणे शक्य होत नसल्याने आमच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे २३ जानेवारी रोजी दातीवरे ते झाई दरम्यानचे सर्व मच्छीमार आपला व्यवसाय सोडून समुद्रात बोटी घेऊन जात अतिक्रमण करणाऱ्या घुसखोरांविरोधात ‘भगाव मोहीम’ राबवणार आहेत.>सोमवारी होणार बैठकमढ आणि भाटीमधील अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी करण्यात आली असून या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार,१३ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष आंभिरे यांनी दिली.