शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा कारभार रामभरोसे; लाभार्थ्यांचे हाल, अधिकारी रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:10 IST

डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयातील प्रकल्पाधिकारी व सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे ११ नोव्हेंबरपासून रजेवर असल्याने येथील कारभार जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

- शौकत शेखडहाणू : पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असलेल्या डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयातील प्रकल्पाधिकारी व सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे ११ नोव्हेंबरपासून रजेवर असल्याने येथील कारभार जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते एक दिवसही येथे आले नसल्याने, येथील लाभार्थ्यांचे हाल सुरू झाले आहेत.गेल्या अकरा दिवसांपासून डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या डहाणू, पालघर, तलासरी, वसई तालुक्यातील, आश्रमशाळा, निवासी वसतिगृहे, अनुदानित शाळा, महाविद्यालय आणि ठक्करबाप्पा योजनेअंतर्गत, विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांची २५ कोटींची बिले मंजुरीविना पडून राहिलेली आहेत. तसेच विकासकामे मंजूर असूनही ठप्प झाली आहेत तर खाजगी आश्रमशाळा, वसतिगृहे यांच्या इमारतीच्या भाड्याबरोबरच निवासी वसतिगृहांचे आहार बिल थकले आहे.गेल्या तीन-चार वर्षापासून स्वतंत्र सनदी अधिकाºयाची प्रकल्पाधिकारी म्हणून नेमणूक न करता डहाणू येथील सहायक जिल्हाधिकाऱ्यांकडे डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा पदभार सोपविण्यात आल्यामुळे, त्यांना दोन्हीकडची कामे उरकण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत ३५ आश्रमशाळा, १७ शासकीय निवासी वसतिगृहे आणि अनुदानित विद्यालय असून, त्यात सुमारे २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय जिल्हाभरातील ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत होणारे, रस्ते, पूल, साकव, अंगणवाड्या इमारती आणि घरकुलांच्या लाभार्थ्यांवर हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. दरम्यान, कटियार हे दोन डिसेंबर रोजी येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हाभरातून येणा-या नागरिकांना कामाविना हात हलवत परत जावे लागत आहे.डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा प्रकल्पाधिकारीपदाचा पदभार हा जव्हार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिका-यांकडे सोपविण्यात आला आहे, ते येऊन येथील कामकाज पाहतात.- एस .एम.मते,सहायक प्रकल्पाधिकारी 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार