शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाण्याने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:23 IST

घटनास्थळी मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी दिली भेट; अहवाल तहसीलदारांना देणार

मनोर : मनोर-पालघर रस्त्यावर अंभई गावाच्या हद्दीतील छेडा वेफर्स कंपनीतून निघणाऱ्या दूषित पाण्याने भातशेती खराब झाली होती. याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन शेतातील विहिरींच्या दूषित पाण्याची मंगळवारी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पाहणी केली. तीन महिन्यांनंतर महसूल खात्याला जाग आल्याबाबत शेतकऱ्यांनी या वेळी नाराजीचा सूर आळवला.आठ वर्षांपासून कंपनीकडून शेतामध्ये घाण पाणी साेडले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत जूनमध्ये शेतीच्या कामाला सुरुवात हाेताच तहसीलदार कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कंपनीकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही काेणीही दखल घेतली नाही. यानंतर आमदार रवींद्र फाटक आणि जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामडी यांच्याकडे या समस्येबाबत व्यथा मांडल्यानंतर त्यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. याआधी शेतकरी सुधाकर अकरे, वसंत अकरे व इतर शेतकऱ्यांनी अनेकदा पत्रव्यवहार करूनही एकदाही दखल घेतली नाही. मात्र, आमदार फाटक आणि जि.प. अध्यक्ष कामडी यांनी दखल घेताच महसूल खात्याने मंगळवारी पाहणी केली. मंडळ अधिकारी सदानंद भोई व तलाठी यांनी शेतात पाहणी करून पंचनामा केला. या पाहणीनंतर कंपनीवर काय कारवाई हाेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या पाहणीविषयी कंपनीचे व्यवस्थापक दत्ता बाेराडे यांच्याशी संपर्क केला असता गाडी चालवत असल्याचे सांगून बोलण्यास टाळाटाळ केली.कंपनीचे पाणी शेतात कसे येते, याचा पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वाडा तालुक्याच्या तहसीलदारांना देणार आहे. त्यानंतर त्यावर ते निर्णय घेतील.- सदानंद भोई, मंडळ अधिकारी, कंचाड-वाडाशेतीच्या नुकसानामुळे येथील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यांनी सतत पाठपुरावा करूनही काहीच हाेत नव्हते. आता अधिकाऱ्यांनी भेट दिल्याने दिलासा मिळाला.