शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

मारकुट्या मुख्याध्यापकाची चौकशी सुरू

By admin | Updated: January 9, 2017 06:14 IST

डहाणू तालुक्यातील अस्वाली आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांनी ३१ डिसेंबेरच्या रात्री विद्यार्थ्यांना मारहाण

अनिरु द्ध पाटील / बोर्डी डहाणू तालुक्यातील अस्वाली आश्रमशाळेतील मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांनी ३१ डिसेंबेरच्या रात्री विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान संबंधित मुख्याध्यापकाला तत्काळ निलंबित करण्याची मागणी विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी केली आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प डहाणू कार्यालयांअतर्गत बोर्डीनजीक अस्वाली आश्रमशाळा आहे. तिचे मुख्याध्यापक यशवंत लक्ष्मण वाघ यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून मध्यरात्रीच्या सुमारास ३५ ते ४० विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली. या मध्ये ५ वी ते ९ वीतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान वाघ यांच्या दंडुकेशाही व दडपशाही विरोधात विद्यार्थ्यांनी संघटित होऊन प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रकल्प अधिकारी आँचल गोयल यांनी विस्तार अधिकाऱ्यांमार्फत वाघ यांची चौकशी सुरू केली आहे. प्रथमदर्शनी विद्यार्थ्यांना थोडीफार शिक्षा केल्याचे वाघ यांनी चौकशीत मान्य केले आहे. या प्रकरणी वाघ यांचे लेखी स्टेटमेंट घेतले जाणार असून त्यानंतर शासकीय कार्यवाही पूर्ण केल्यानंतर निर्णय घेतला जाईल असे प्रकल्प अधिकारी गोयल यांनी लोकमतला सांगितले. दरम्यान या प्रकरणांचे तीव्र पडसाद उमटले असून विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी वाघ यांना निलंबित करणाची मागणी केली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाने संसदीय कमिटी नियुक्त केली आहे. त्यामध्ये विधानसभा व विधानपरिषदेच्या एकूण १२ महिला आमदारांचा समावेश आहे. आमदार विद्या ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कामिटीचा पालघर जिल्ह्यातील दौरा आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आला. दरम्यान या कमिटीच्या माध्यमातून आश्रमशाळेतील गैरप्रकारांना आळा बसेल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.