शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

जव्हार तालुक्यातील १० ग्रा.पं.ची चौकशी, भ्रष्टाचाराच्या शेकडो तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:21 IST

या तालुक्यातील विविध योजनातील भ्रष्टाचार वाढला असून दिवसेंदिवस भ्रष्ट ग्रामसेवकांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी

हुसेन मेमनजव्हार : या तालुक्यातील विविध योजनातील भ्रष्टाचार वाढला असून दिवसेंदिवस भ्रष्ट ग्रामसेवकांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जि.प. चे मुख्यकार्यकारी अधिकारी मिलींद बोरीकर यांनी १० ग्रा.पं.ची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली अर्थ समितीची सभा पालघरच्या पं. स. सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी हे चौकशीचे आदेश देण्यात आले.जव्हार तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे असून यापैकी वावर, रायतळे, कौलाळे, किरमीरा, दाभलोनल डेंगाचीमेट, धानोशी, कासटवाडी या ग्रामपंचायतीची अर्थ समिती सभेमध्ये चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर यांनी काढले आहेत. या ग्रामपंचायती बाबत भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी समोर आल्यामुळे व पंचायत समिती मार्फत केलेल्या किरकोळ चौकशीमध्ये काही ग्रामपंचयतीत दोषी आढळ्यामुळे त्यांचेवर कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तसेच या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे असे आदेश मुख्य कार्याकारी अधिकारी यांनी दिले आहेत.ग्रामपंचायतीवर होणार संपुर्ण खर्च ग्रामसेवकांच्या व सरपंचाच्या संयुक्त स्वक्षरीने शासनाने सोपविल्यामुळे दोघांच्या संगनमताने वाटेल ते कामे केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार काही ग्रामपंचातीने केल्याचे उघड झाले आहे. तसेच सर्व नियम धाब्यावर बसवून खरेदी करतांना ३ लाखावरील खरेदीला नियमानुसार ई-निविदा करणे बंधनकारक असतांना सर्व खरेदी परस्पर ठेकेदारा मार्फत केली जात आहे.तालुक्यातील ग्रामपंचायातीत शासनाच्या विविध योजना अमलांत आणल्या जात आहेत. यामध्ये १४ वा वित्त आयोग, ५ टक्के पेसा निधी, जन सुविधा निधी, नवीन शौचालय, बांधकाम दुरूस्ती, विहिर, रस्ते, वृक्ष लागवड, आंगणवाडी-बालवाडी बांधकाम व दुरूस्ती, इत्यादी कामांच्या योजना प्रामुख्याने राबविण्यात येत असून याकरीता करोडो रूपयांचा निधी शासनाकडून येत आहे. मात्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या संगनमताने या योजनेची विल्हेवाट लावण्यात येत असून त्यात करोडोचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. काही ग्रामसेवकांवर कारवाईची टांगती तलवार असून एका ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत