शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

बेपर्वाईला लगाम नसल्यानेच निष्पापांचे जाताहेत बळी, चार दशकांत शेकडोंनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 23:51 IST

तारापूर एमआयडीसीमध्ये आग, स्फोट आणि विषारी वायू गळतीबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या झालेल्या अपघातांमध्ये मागील चार दशकांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले आहे.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये आग, स्फोट आणि विषारी वायू गळतीबरोबरच इतर अनेक वेगवेगळ्या झालेल्या अपघातांमध्ये मागील चार दशकांमध्ये शेकडो जणांचा मृत्यू तर अनेकांना अपंगत्व आले असूनही आतापर्यंत दोषी व जबाबदार असणाऱ्यांवर कठोर व ठोस कारवाई होत नसल्यानेच तारापूरमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. या ठिकाणच्या बेपर्वाईला कुणाचाच लगाम नसल्याने निष्पापांचे बळी जात आहेत.औद्योगिक क्षेत्रात अपघात झाल्यानंतर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, कामगार विभाग, पोलीस इत्यादी सर्व विभागांचे अधिकारी चौकशी व तपासणी सुरू करतात, तर मंत्रीगण, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिकारी, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व पुढारी घटनास्थळी भेट देऊन जखमींची रुग्णालयांत जाऊन विचारपूस आणि मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन करतात, तर मंत्रीगण पत्रकार परिषद घेऊन घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देऊन निघून जातात.मंत्रीगण, पुढारी त्यानंतर पुन्हा नव्याने अपघात झाल्यावरच परततात. पुन्हा मागीलप्रमाणे आश्वासने देतात. परंतु दुर्दैवाचा भाग म्हणजे दुर्घटनेनंतर संबंधित विभाग चौकशी व तपासणी करून जो प्राथमिक अहवाल पोलिसांना देतात, त्या अहवालाच्या आधारावर पोलीस गुन्हा दाखल करून पुढे सदर केस न्यायालयात पाठविल्यानंतर तारीख पे तारीख सुरू होते. मात्र त्याचे पुढे काय होते, ते समोरच येत नाही. दुसरीकडे दुर्घटनेत मृत्यू, जखमी किंवा कायमचे अपंगत्व आलेल्यांना नुकसानभरपाई पुरेसी दिली जात नाही. परिणामी त्यांच्या कुटुंबाला मोठे व कायमस्वरूपी आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. आजपर्यंत तारापूरमधील कुठल्याही उद्योजकांवर मोठ्या शिक्षेची कारवाई झाल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. तर दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणी अनेक जण वृत्तपत्रांच्या माध्यमातून करून प्रसिद्धी मिळवतात, परंतु तेही पुढे पाठपुरावा करीत नसल्याने दोषी उद्योजकांवर पर्यायाने व्यवस्थापनावर वचक राहिला नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. मात्र भीषण आग, स्फोट किंवा विषारी वायू गळतीसारख्या दुर्घटना घडतात, तेव्हा अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्यांना पोलिसांची मदत मिळते. हे दोन्ही विभाग तत्परतेने काम करताना दिसतात.उत्पादन खर्च कमी करण्याच्यानादात सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्षतारापूर एमआयडीसीमधील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात धोकादायक रासायनिक कारखान्यांबरोबरच स्टील, टेक्स्टाईल, औषधांच्या निर्मितीकरिता लागणारा कच्चामाल, कीटकनाशक असे सुमारे बाराशे लहान-मोठे उद्योग आहेत. तर रासायनिक प्रक्रि या करताना अत्यंत विषारी आणि ज्वालाग्रही रसायनांचा वापर केला जातो. बहुसंख्य कारखान्यांमध्ये बॉयलर आणि रिअ‍ॅक्टर्स कार्यरत आहेत. या दोन्हीमधील तापमान मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात वाढले तर त्याकरिता सेफ्टी वॉलसह अनेक उपकरणे सुस्थितीत असतील तर अपघाताची शक्यताच नसते. परंतु उत्पादन खर्च कमी करण्याच्या नादात सुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष केले जाते तसेच विषारी वायू आणि ज्वलनशील पदार्थ वाहून नेणा-या पाइपलाइनच्या दुरु स्ती आणि देखभालीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. याचा परिणाम गंभीर दुर्घटनेत होतो. 

टॅग्स :palgharपालघर