शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत अन्याय ? जि.प.तील प्रा. शिक्षकांची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 05:42 IST

जि.प.तील प्रा. शिक्षकांची व्यथा : मनसेकडून जिल्ह्यातील शिक्षकांसाठी आंदोलनाचा इशारा

हितेन नाईकपालघर : जिल्ह्यातील १४५ पदवीधर शिक्षकांनी पदवीधर पदास नकार देत बदली पोर्टलला प्राथमिक शिक्षक म्हणुन नोंद केली होती. मात्र, याबाबत कोणतीही पूर्व सुचना न देता शासनाने गोपनिय रित्या पोर्टलला पदवीधर म्हणून नोंद करीत शिक्षकांच्या मुलभूत अधिकारावर अन्याय केल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.

जि प ठाणेकडून १९ जुलै २०१४ रोजी समुपदेशनाने प्राथमिक शिक्षकांमधुन पदवीधर शिक्षक म्हणून ९३००-३४८०० ग्रेड पे ४३०० ची वेतनश्रेणी देण्यात आली होती. २८ जून २०१७ च्या गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी शासनाची मान्यता न घेतल्याने ही वेतन श्रेणी १ जून २०१७ रोजी तत्काळ रद्द करु न ९३००-३४८०० ग्रेड पे ४२०० या वेतनश्रेणीत उपशिक्षक म्हणून आदेशित करण्यात आले होते. त्या नुसार सर्व शिक्षक प्राथमिक शिक्षक म्हणून आजतागायत काम करीत आहेत.संबधीत वेतनश्रेणी काढुन घेतल्यानंतर प्रशासनाने महाराष्ट्र शासन शिक्षक पोर्टलवर प्राथमिक शिक्षक विना पदविधर शिक्षक अशी नोंद होणे आवश्यक असताना जाणीव पुर्वक बदलले नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. या बाबत पालघर जिल्ह्यातील ४५ पदवीधर शिक्षकांनी पदवीधर पद नको असल्याबाबत ३ डिसेंबर २०१८ च्या पत्रान्वये विहीत नमुन्यात नकार अर्ज सादर केलेला असतांना त्यांना प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परीषद शिक्षण विभागाने शासनाच्या शिक्षक पोर्टलवर प्राथमिक शिक्षक अशी नोंद कशी काय करण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच ९ जानेवारी २०१९ च्या पत्रान्वये उर्वरित जिल्ह्यातील १०० शिक्षकांवरही असाच अन्याय झाला आहे. जिल्हांतर्गत बदली प्रक्र ीयेत आम्ही प्राथमिक शिक्षकांनी बदली पोर्टलवर आॅनलाइन अर्ज भरु न २० शाळांचे पर्याय दिले आहेत. असे असतांनाही शिक्षण विभागाने कोणत्याही शिक्षकांना लेखी पत्राद्वारे अवगत न करता १४५ प्राथमिक शिक्षकांना गोपनीयतेच्या माध्यमांतून बदली पोर्टलवर पदवीधर शिक्षक म्हणून नोंद केल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी सांगितले.शिक्षकांच्या विनंती अर्जा नुसारच बदल करण्यात आले होते. मात्र शासनाने त्याला मान्यता दिली नाही, त्यामुळे जैसे थे परिस्थिती ठेवण्यात आली आहे.-राजेश कंकाळ, (प्राथमिक) शिक्षणाधिकारी, जि.प.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणे