शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मकरसंक्रांतीवर महागाईचे सावट; सुगड, तीळगूळ महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 23:27 IST

मजुरी, साहित्य, मेहनत, वेळ आदींचा परिणाम

राहुल वाडेकरविक्र मगड : मकर संक्रांत अवघ्या तीन दिवसांवर आल्याने वेगवेगळ्या आकारांची सुगडे ग्रामीण भागासह विक्रमगडच्या बाजारात दाखल झाली आहेत. संक्रांतीच्या तयारीसाठी बाजार फुलून गेला आहे. सर्वसामान्यांचा आवडता सण असलेल्या संक्रांतीच्या सणावर यंदा महागाईचे सावट पसरलेले आहे. सर्व महिला आपल्या सौभाग्याचे रक्षण आणि मनातील दुरावा दूर करण्यासाठी संक्रांतीला एकमेकांना हळदी कुंकवाचे वाण देतात, मात्र महिलांच्या या वाणांवरही महागाईचे सावट पसरले आहे.

संक्रांतीसाठी सुगड आवश्यक असतात. सुगड पुजण्याची प्रथा परंपरेनुसार आजही विक्र मगड परिसरात त्याच श्रद्धेने निभावली जात आहे. परंतु नेहमीच्या माहागाईमध्ये सुगड महाग झाली आहेत. लहान आकाराची सुगड ४० ते ५० रुपयांना पाच तर मोठ्या आकाराची सुगड ७० ते ८० रुपयांना पाच नग या भावाने विक्रमगडच्या बाजारात विकायला आली आहेत.

दिवसेंदिवस महाग होत चाललेली माती, ते बनविण्याची मजुरी, साहित्य, मेहनत, वेळ आदीचा परिणाम सुगडांवरही झालेला दिसत आहे. संक्रांतीचे सगळ्यात मोठे आकर्षण असले तरी महिलांचे मात्र सुगडाचे वाण देण्याची प्रथाही आपल्याकडे आहे. हुरडा, बोर, गाजर, शेंगदाणे, एखादे फळ, ऊस आणि तीळगूळ सुगडात ठेवून ते महिला एकमेकींना देतात. त्यामुळे बाजारात सध्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू आहे.

सुगड व त्यातील साहित्याप्रमणेच महिलांची गर्दी तीळ आणि गूळ खरेदीकरिता दिसून येत आहे. बाजारात गेल्या वर्षी १६० रुपये किलो तिळाची (पॉलीसचे तीळ) किंमत होती, ती यंदा १८० वर गेली आहे. तर चिकीच्या गुळाची किंमत ५५ रुपये किलो होती, यंदा मात्र या गुळाची किंमत ७० ते ८० रुपये झाल्याचे विक्रमगड येथील दुकानदार व्यापारी विकास आळशी यांनी सांगितले.वस्तू मिळणे अवघडमकर संक्र ांत ही दरवर्षी १४ जानेवारीलाच येते, मात्र यंदा ती १५ जानेवारीला म्हणजेच एक दिवस पुढे हा सण गेला आहे. सध्या जानेवारीमध्येही थंडीची लाट असल्याने याचा परिणाम होऊन शेतातील गहू, हरभऱ्याची पिके अजूनही तितक्या प्रमाणात भरलेली दिसत नाहीत. एक वेळ ऊस मिळले, पण बोर, हरभºयाची डहाळे कुठून आणणार, त्यामुळे संक्रांतीला या वस्तू मिळणे अवघड झाले असल्याचे काही महिलांनी सांगितले.