शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

होळीच्या तोंडावर पुरणपोळ्यांनाही महागाईची झळ

By admin | Updated: March 11, 2017 02:09 IST

होळी तोंडावर असतांना महागाईची झळ पुरण पोळीला जाणवली असून गत वर्षीच्या तुलनेत तिचे दर वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, महागाई असुनही काही छोटया विक्रेत्यांनी

- राहुल वाडेकर,  विक्रमगडहोळी तोंडावर असतांना महागाईची झळ पुरण पोळीला जाणवली असून गत वर्षीच्या तुलनेत तिचे दर वाढल्याचे दिसून आले. दरम्यान, महागाई असुनही काही छोटया विक्रेत्यांनी पुरणपोळयांचे दर वाढविलेले नाहीत. वरकरणी हा त्यांचा मोठेपणा वाटत असला तरी त्यातही त्यांनी बिझनेस फंडा वापरला आहे. पुरणपोळयांचा आकार व वजन यावर हे दर अवलंबुन असल्याने छोटया आकाराच्या पुरणपोळया २० रुपयांनी तर मोठया आकाराच्या पुरणपोळया ३० रुपयांनी विकल्या जाणार असल्याचे दर पाटीवर दिसत आहेत.होळी म्हटंली की, तुपाच्या धारेसोबत गरम पुरणपोळी आठवते़ होळीला नैवेद्य दाखविला की, पुरणपोळीवर ताव मारायचा़ सध्याच्या आधुनिक युगामध्ये, धावपळीच्या जिवनात घरी पुरणपोळया करण्याचे प्रमाण कमी झाले असले तरीही शहरी भागातील अपवाद वगळता पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातील अनेक गृहीणी घरीच पुरणपोळया बनवणे सोयीस्कर मानतात. तर बाहेरुन तयार पुरणपोळी घेण्याकडेही नोकरदार महिलांचा कल वाढलेला आहे़ मात्र, महागाईमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तयार पुरणपोळीची किंमत दहा रुपयांनी वाढली आहे़ सध्या मिठाईच्या दुकानातुन पुरणपोळयांची मोठया प्रमाणावर विक्री होत असते. या पार्श्वभुमीवर विक्रमगडमध्ये घरगुती पुरणपोळी बनविणाऱ्यांची संख्याही खुप आहे़ महागाईमध्ये वाढ झाली असली तरी, यंदा चांगल्याप्रकारे पुरणपोळयांची विक्री होईल, असा अंदाज विक्रमगड येथील पुरणपोळी विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे़ दरम्यान, होळी खरेदीची गर्दी वाढती आहे.पुरणपोळी विक्रेत्यांनी मांडले महागाईचे गणितयाबाबत पुरणपोळयांच्या किमतीत दहा रुपयांनी वाढ झाल्याची कारणे सांगताना घरगुती पुरणपोळी विक्रेत्या विक्रमगड येथील महिला वंदना विलास वाडेकर सांगतात की, पुरणपोळया तयार करणाऱ्या महिला दिवसावर काम करतात़ आतापर्यत या महिला दिवसाला १५० रुपये घेत होत्या़ मात्र आता गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे़ लाकडांची मौळी देखील महाग झाली आहे. पुरणपोळी करीता लागणारे साहित्य चणाडाळ, गुळ, वेलची यांच्याही किंमती वाढलेल्या आहेत. गेल्या वर्र्षी २० रुपयांना मिळणारी मोठया आकाराची पुरणपोळीची किंमत ३० रुपये झाली आहे. या दराप्रमाणेच त्याची विक्री केली तर ते परवडणार आहे.