शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

करवाढ मागे घेण्यासाठी वाढता दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:36 IST

ग्रामीण भागातील वाढीव घरपट्टी मागे घेण्यात यावी यासाठी सर्वपक्षीयांचे जबाब दो आंदोलन सुरु असून प्रशासन मात्र आपल्या

शशी करपे वसई : ग्रामीण भागातील वाढीव घरपट्टी मागे घेण्यात यावी यासाठी सर्वपक्षीयांचे जबाब दो आंदोलन सुरु असून प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सर्वपक्षीयांनी आता आयुक्त चलो जाव आंदोलनाची घोषणा केली आहे. तर महापौरांनी यातून मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीयांशी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.वसई विरार महापालिकेने ग्रामीण भागात घरपट्टी वाढीचा निर्णय घेतल्याने घरपट्टीत दुपटीने वाढ झाली आहे. त्याविरोधात जनआंदोलन समितीने सर्वपक्षीय संघर्ष समिती स्थापन करून जबाब दो आंदोलन सुरु केले आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी ग्रामीण भागातील वार्डात जाऊ़न चौकसभा घेत आहेत. त्यानंतर स्थानिक नगरसेवकाच्या कार्यालयासमोर जाऊन जबाब दो चा नारा देत आहेत. यावेळी नगरसेवक लोकांपुढे येऊ़न आपली बाजू मांडत आहेत. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक लॉरेल डायस वगळता सर्वच नगरसेवकांनी घरपट्टी वाढीला विरोध असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी पक्षाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांना लोकांच्या भावना कळवण्यात आल्या आहेत. असे असले तरी महापालिका प्रशासन मात्र आपल्या भूमिकेवर अद्याप ठाम आहे. गावात मात्र महापालिकेकडून अद्याप नोटीसा आणि जप्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होईल या भितीपोटी गोडीगुलाबीने घरपट्टी वसुली करण्याचे धोरण महापालिकेकडून अवलंबवण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने जनआंदोलन समितीने सर्वपक्षीयांच्या मदतीने आयुक्त चलो जाव आंदोलन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी दिली. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सचिव दत्ता नर, कॅथॉलिक बँकेचे चेअरमन ओनिल अल्मेडा, माजी नगरसेविका बीना फुर्ट्याडो, जिल्हाध्यक्ष पुष्कराज वर्तक यांनी महापौरांची भेट घेतली.