शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पालघरचा कोटा वाढवा

By admin | Updated: February 20, 2017 05:26 IST

पालघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून २०३१ सालच्या पाणीपुरवठ्याची अपेक्षित लोकसंख्येचा टप्पा आताच

हितेन नाईक / पालघरपालघर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून २०३१ सालच्या पाणीपुरवठ्याची अपेक्षित लोकसंख्येचा टप्पा आताच पार झाला आहे. नजीकच्या मुंबई महानगरातून पालघरकडे सरकणारा लोंढा, जिल्ह्याची निर्मिती आणि त्या अनुषंगाने सिडकोची होणारी निर्मिती ह्यामुळे भविष्यात सर्वाना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पालघर नगरपालिकेवर पडणार आहे. त्यामुळे पालघर व २६ गावे प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी नगरपरिषद २०१२ पासून राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाकडे करीत असून पालकमंत्र्यांनी ह्या बाबी कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.पालघर नगरपरिषदेची स्थापना सन १९९८ साली झाली. त्यात पालघर, टेम्भोडे, अल्याळी, लोकमान्यनगर, नवली, वेवुर, घोलवीरा, गोठणपुर आदी आठ गावांचा समावेश आहे. सन २०११ च्या जनगणने नुसार नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या ६८ हजार ८८५ इतकी आहे. आॅगस्ट २००९ पासून पालघर शहर व सातपाटी, शिरगाव आदी २६ गावांना नळपाणीपुरवठा योजने मधून जुन्या पाईप लाईन वरून प्रायोगिक तत्वावर पाणीपुरवठा सुरु केला. या योजनेसाठी पुढील तीस वर्षाच्या ज्या लोकसंख्येवर आधारावर योजना तयार करण्यात आली त्या लोकसंख्येच्या दुप्पटीने आकडा पार झाला आहे.वाढते शहरीकरण व औद्योगिकरणा बरोबरीने पालघरला जिल्हा मुख्यालय म्हणून आलेल्या स्वरूपाची भर पडलेली आहे. याच बरोबरीने येत्या चारपाच वर्षात १४० हेक्टरवर जिल्हा मुख्यालय व सुमारे ३०० हेक्टर वर पालघर नवनगर बसणार आहे. सिडको निर्मित हे नवनगर पालघर नगरपरिषदेचाच एक भाग बनणे अपेक्षित आहे. अश्या परिस्थितीत पालघर नगरपरिषदेच्या पाण्याची गरज आताच दुपटीने व आगामी २० वर्षाचा विचार करता अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.या पाशर््वभूमीवर पालघर नागरपरिषदे साठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व दरम्यानच्या कालावधीसाठी सध्या उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या काट्यात वाढ ही अत्यावश्यक बाब बनली आहे. त्या दृष्टीने नगरपरिषदेने जलसंपदा विभागाकडे प्रस्ताव पाठवला असून पालक मंत्री विष्णू सवरा ह्यांना कल्पना दिल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष उत्तम घरत ह्यांनी लोकमतला दिली. त्यामुळे आता पालक मंत्र्यांनी ह्या बाबत पुढाकार घ्यायला हवा.असे आहे पाणीपुरवठ्याचे गणितपालघर व नळपाणीपुरवठा योजना मंजूर करताना या योजनेसाठी कार्यकारी अभियंता भातसा कालवा योजने मधून दररोज ५.४८ एम एलडी पाणीपुरवठ्याचा कोटा मंजूर करण्यात आला आहे. यातील २ एम एलडी इतके पाणी योजनेतील इतर गावांना जाते. व पालघर नागरपरिषदेला केवळ ३.४८ एम एलडी इतकेच पाणी उपलब्ध होत आहे. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण दरडोई ३४.८ लिटर्स इतके आहे. शासनाच्या निकषानुसार नागरी भागासाठी दरडोई ७० लीटर इतक्या पाण्याची गरज आहे. ह्या पाशर््वभूमीवर सध्या उपलब्ध होणाऱ्या पाण्याइतकेच अधिक पाणी नगरपरिषद क्षेत्रासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे. ही योजना तयार करताना ज्या लोकसंख्येच्या आधारावर हि योजना तयार करण्यात आली त्यापेक्षा कित्येक पटीने आताच लोकसंख्या वाढ झाली आहे.त्यामुळे वरील मंजूर कोट्यातून वाढीव लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकत नाही. नगरपरिषद हद्दीतील १ लाख लोकसंख्या व आजूबाजूच्या परिसरातील सुमारे १.२५ लाख लोकसंख्या पाहता दररोज सुमारे १५.७५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. शहराचे वाढते नागरिकीकरण पहाता घरगुती नळ कनेक्शन सोबत रहिवासी संकुलासाठीची मोठी मागणी वाढू लागली आहे.पाणीपुरवठा करणे बंधनकारकपालघर शहर हे मुंबई महानगरा लगत असल्याने उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्याने मोठ्या प्रमाणात लोंढेच्या लोंढे पालघर व परिसरात येत आहेत. वर्ष २००१ च्या जनगणने नुसार शहराची लोकसंख्या ५२ हजार ६७० होती. ती २०११ च्या जनगणने नुसार सुमारे ७० हजार इतकी झाली आहे. आज मितीस तरंगती लोकसंख्या धरून या शहराची लोकसंख्या १ लाखाच्या इतकी झाली आहे. अश्यावेळी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती अधिनियम १९६५ चे कलाम ५० अन्वये पाणीपुरवठ्याची योजना तयार करणे आणि विविक्षत मुदतीत पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे नगरपरिषदेला बंधनकारक आहे.