शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या अर्धवट कामांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 00:43 IST

भिवंडी-वाडा-मनाेर रस्त्यावर चालकांची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा : भिवंडी-वाडा-मनोर  हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांत गेला आहे. रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने अवजड वाहने उलटण्याचे प्रमाण वाढले आहेत. यामुळे वाहनमालकांचे प्रचंड नुकसान होत आहे. भिवंडी-वाडा-मनोर हा रस्ता बांधा वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर शासनाने सुप्रीम कंपनीला २०११ मध्ये दिला होता. दोन महिन्यांचा कालावधी या कामासाठी दिला होता. मात्र, दहा वर्षांचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. 

पिंजाळ व देहर्जे या नद्यांवरील पुलांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. तर वनविभागाच्या १६ किमी अंतराचा रस्ता अद्याप दुपदरीच आहे. वाडा ते अंबाडी यादरम्यानच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता प्रत्येक पावसाळ्यात खड्ड्यात जातो. त्यानंतर रस्त्याची डागडुजी केली जाते. मात्र, रस्ते सतत खड्ड्यात जात असल्यामुळे हा रस्ता पुन्हा सुप्रीम कंपनीकडून काढून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून काही ठिकाणी तर डांबर बघावयास मिळत नाही. कुडूसनजीक कंचाड फाटा येथे रस्ता एका बाजूने सिमेंट काँक्रिटीकरणाचा आहे. तर दुसऱ्या बाजूने डांबरीकरणाचा आहे. त्यामुळे सिमेंट क्राँक्रिटीकरण व डांबरीकरण यामधील अंतर एक ते दीड फूट अंतराचे असल्याने येथे गाड्या घसरून उलटत आहेत. सिमेंट काँक्रिटीकरणाच्या बाजूला मातीचा भराव न टाकल्याने खोल भाग झाला आहे. एक आठवड्यापूर्वी एक कंटेनर येथेच उलटला होता. तर रात्री पुन्हा एक कंटेनर उलटला आहे. या अपघातामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे. 

 भिवंडी-वाडा महामार्गावरील कंचाड फाटा येथील अपूर्ण काम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येईल. -  अनिल बरसट, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाडा 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारthaneठाणे