शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

उद्घाटन झाले पण वाड्यातील भातखरेदी केंद्रे अद्यापही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 00:22 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतीक्षित आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी वाडा तालुक्यातील परळी व पोशेरी या दोन ठिकाणी करण्यात आले.

वाडा : दिवाळीपूर्वी मोठा गाजावाजा करत आमदार दौलत दरोडा, आमदार सुनील भुसारा व आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत वाडा तालुक्यातील विविध ठिकाणी आधारभूत भातखरेदी केंद्रांचे उद्घाटन केले होते. मात्र, १८ दिवस झाले तरी प्रत्यक्षात आजपर्यंत एकाही ठिकाणचे भातखरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत येथील शेतकऱ्यांवर मातीमोल भावाने आपला भात व्यापाऱ्यांना देऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ आली. परिणामी, शेतकरी नाराज आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेच्या बहुप्रतीक्षित आधारभूत खरेदी केंद्राचे उद्घाटन ९ नोव्हेंबर रोजी वाडा तालुक्यातील परळी व पोशेरी या दोन ठिकाणी करण्यात आले. यावेळी तालुक्यात अन्य सात ठिकाणी अशाच प्रकारची भातखरेदी केंद्रे उद्यापासून सुरू होतील, असे उद्घाटनप्रसंगी आमदार दौलत दरोडा यांनी सांगितले. मात्र, नव्याने दुसरी खरेदी केंद्रे सुरू झाली नाहीच, पण प्रत्यक्षात उद्घाटन करण्यात आलेल्या केंद्रांवरही आजपर्यंत खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. भातउत्पादक शेतकऱ्यांच्या भाताला आधारभूत केंद्रांवर चांगला दर (१६६८ रुपये प्रति क्विंटल) मिळेल व दिवाळी सण आनंदात साजरा करता येईल, याच विचारात येथील शेतकरीवर्ग होता. मात्र, प्रत्यक्षात ही खरेदी केंद्रे सुरूच झाली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत भात अन्य व्यापाऱ्यांना मातीमोल भावात विकावा लागून दिवाळी साजरी करावी लागली.

दिवाळीपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून भातखरेदी केंद्रांंचे उद्घाटन केले. मात्र, ती प्रत्यक्ष सुरू न केल्याने शेतकऱ्यांना भात विकता आला नाही. आघाडी सरकारचा भोंगळ कारभार सुरू असून प्रशासनावर वचक राहिलेला नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे हे सरकार आहे. - नंदकुमार पाटील,  जिल्हाध्यक्ष, भाजप पालघर

मी गेल्या तीन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला असून मला याबाबत माहिती नाही. माहिती घेऊन कार्यवाही करतो. -विजय गांगुर्डे, प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ जव्हार