शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढासळत्या ‘सूर्या’तून अपुरा पाणीपुरवठा, १० वर्षांत देखभाल दुरुस्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 02:31 IST

डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो.

शशिकांत ठाकूरकासा : डहाणू व पालघर तालुक्यातील गावांना शेतीला उन्हाळ्यामध्ये सूर्या कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून कालव्यांची दुरुस्तीच केली नसल्याने शेतीला अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे त्याचा शेतीला फटका बसत आहे. कासा जवळील सूर्या नदीवर धामणी येथे ४० वर्षांपूर्वी धरण बांधण्यात आले. सिंचन हा प्रमुख उद्देश ठेऊन हे धरण बांधण्यात आले. आणि १४ हजार ५०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा हेतू होता.डहाणू तालुक्यातील तवा, पेठ, धामटने, कोल्हान, सोनाळे, खाणीव, कासा, चारोटी, सूर्यानगर, वेती, वरोती, मुरबाड, वांगर्जे, उर्से, साये, म्हसाड, दाभोण, ऐना, साखरे, घोळ, भराड,रानशेत, आदी ठिकाणी तर पालघर तालुक्यातील आंबेदा, नानीवली, बºहाणपूर, आकेगव्हान, चिंचारे, सोमटा, बोरशेती, कुकडे, महागाव आदी गावांना अश्या एकूण ७० ते ८० गावांना उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा केला जातो. शेतकरी सदर काळव्याच्या पाण्यावर उन्हाळ्यात भातशेती बरोबरच भाजीपाला, भुईमूग आदी पिके घेतात. मात्र गेल्या १० वर्षांपासून कालव्यांची दुरु स्तीच केली जात नसल्याने ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा निचरा होत आहे.काही ठिकाणी कालवे उथळ व गेट तुटल्याने पाणी वाया जाते. त्यामुळे शेवटच्या भागापर्यंत पाणी जातच नाही. कालव्यातून होणार पाण्याचा निचरा रोखण्यासाठी मुख्य कालवे व उप कालव्यांचे सिमेंटने बांधकाम केले होते. मात्र, वेळोवेळी दुरु स्ती व सफाई न केल्याने बºयाच ठिकाणी कालव्याचे बांधकाम, प्लॅस्टर वाहून व तुटून गेले आहेत.>अपुरा पाणीपुरवठा; शेतीला बसला फटकासारणी, उर्से म्हसाड, आंबिवली, साये, घोळ, भराड , आदी ठिकाणी तर कालव्यांचे पूर्ण बांधकाम व प्लॅस्टर तुटून गेले आहे. तर पेठ, धामटने, घोळ, नानिवली, चिंचारे, आदी ठिकाणी तर कालव्याचे शेतीला पाणीपुरवठा करणारे गेट नादुरु स्त झाले आहेत तर काही ठिकाणी तुटून गेले आहेत. त्यामुळे ठिक ठिकाणी पाणी शेतीला न जाता वाया जात आहे. तसेच बºयाच ठिकाणी सतत गाळ साचल्याने कालवे नादुरु स्त झाले आहेत. गेट, मोºया गाळाने भरल्याने पाण्याचा निचरा होतो त्यामूळे शेतीला वेळोवेळी पाणीपुरवठा होत नाही. तसेच कालव्यांच्या नादुरु स्ती मुळे कालव्यांना जोडणाºया अखेरच्या गावांना अर्धवट व अपुरा पाणीपुरवठा होतो. त्यामुळे अशा गावांनी दोन वर्षपासून शेती करणे बंद केली आहे. त्यामुळे कालव्यांची दुरु स्ती अभावी शेतीला अपुरा पाणीपुरवठा होत असून त्याचा फटका शेतीला बसत आहे.