शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गायींची अवैध वाहतूक करणारे अटकेत

By admin | Updated: February 21, 2017 05:13 IST

गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या गायी शहापूर येथून आणण्यात आल्या होत्या

वसई : गायींची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या गायी शहापूर येथून आणण्यात आल्या होत्या. तसेच नालासोपारा येथील एका बेकायदा कत्तलखान्यात विकल्या जाणार होत्या, अशी प्राथमिक माहिती तपासात उजेडात आली आहे. वज्रेश्वरी रोडवरुन शिरसाड दिशेने गायींची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच बजरंग दल, विश्व हिंंदू परिषद व भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदेच्या नालासोपारा येथील कार्यकर्त्यांनी मांडवी पोलिसांत धाव घेतली होती. त्यानंतर मांडवी पोलिसांनी सहा गायींची बेकायदा वाहतूक करणारा टेम्पो ताब्यात घेतला होता. पोलिसांनी याप्रकरणी वसईतील भुईगाव येथील सचिन जनार्दन नाईक (२८) आणि गणेशपुरी येथील पांडू माया भोईर यांनी अटक करून टेम्पो जप्त केला आहे. या गायी शहापूर, खर्डी या भागातून वाहनात भरुन नालासोपारा पश्चिमेतील वाझा मोहल्यामधील शरिफ काझी व नझीर शेख यांच्याकडे कत्तलीसाठी पोचवण्यात येणार होती, अशी माहिती पोलिसांना चौकशी दरम्यान मिळाली आहे. या गायी सकवार येथील जीवदया मंडळाच्या गो शाळेत दिली असून या दोन आरोपीवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (वार्ताहर)