शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

माणिकपुरात बेकायदा डम्पिंग ग्राउंड

By admin | Published: January 23, 2017 5:12 AM

माणिकपूर शहरात शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या एका मोकळ्या मैदानात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून

वसई : माणिकपूर शहरात शंभर फुटी रस्त्यावर असलेल्या एका मोकळ्या मैदानात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असून त्यात मेडिकल वेस्टचे प्रमाण अधिक आहे. माणिकपूर पोलिसांनी अशा रितीने कचरा बेकायदेशीर टाकणारी एक गाडी जप्त केली आहे.शंभर फुटी रस्त्याजवळ मोकळे मैदान आहे. त्याठिकाणी दररोज ट्रक, टेम्पो आणि डंपरमधून कचरा आणून टाकला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाराम मुळीक यांनी पालिका आणि पोलिसांकडे केली आहे. तसेच कचरा टाकणाऱ्या गाड्यांचे फोटोही दिले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करून एक गाडी जप्त करण्यात आली.याठिकाणी मेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणावर टाकले जाते. हा कचरा आरोग्यासाठी हानीकारक असल्याने त्यांनी कचरा टाकणाऱ्या गाडी चालक आणि कामगारांना हटकले होते. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांना पाठवून तक्रार केली होती. पण, महापालिकेकडून कोणतीच कारवाई झाली नाही, असा त्यांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)