शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश झालेल्या विनीतकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:09 IST

शिक्षकांचा भयानक अमानुषपणा; उपचार करण्याऐवजी नातेवाइकांच्या स्वाधीन केले

- हितेन नाईकपालघर : जिल्हापरिषदेच्या देवखोप शाळेत शिकणाऱ्या विनीत हडळ (इ.४थी) या आदिवासी विद्यार्थ्याच्या पायाला विषारी सापाने चावा घेतल्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यासाठी एकही शिक्षक धावून आला नाही. त्याच्या नातेवाईकांनाच सारी धावपळ करावी लागली त्यांनीच त्याला आधी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात. व नंतर अधिक उपाचारासाठी त्याला सिल्व्हासा येथे नेले. शिक्षकांच्या ह्या असंवेदनशील प्रवृत्तीच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.पालघर-मनोर रस्त्यावरील देवखोप या आदिवासी बहुल भागात असणाºया जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळेत गडग पाड्यातील विनीत हा चौथीत शिक्षण घेतो, तो शनिवारी शौचाला गेला असता पायाला सापाने दंश केला. तो काही वेळाने लंगडत चालू लागल्याचे विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले. वास्तविक शिक्षकांनी चौकशी करून त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाणे अपेक्षित असतांना त्यांनी सरळ नातेवाईकांना बोलावून त्याला त्यांच्या हवाली केले आणि आपली जबाबदारी झटकली.विनीतच्या काकांनी त्याला उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉ.दिनकर गावित यांनी त्याची तपासणी करून व अंगात भिनलेल्या विषाची मात्रा पाहून त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. मात्र त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात विष पसरले होते. अनेक इंजेक्शन देऊनही विनीत उपचाराला हवा तसा प्रतिसाद देत नसल्याने डॉक्टरांनी त्याला मुंबई, अथवा अन्य ठिकाणच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. डॉ.गावितांशी बोलून अ‍ॅम्ब्युलन्स तयार ठेवली. सेनेचे तालुकाध्यक्ष विकास मोरे ह्याच्या कडे आर्थिक मदत मागितली असता ती मिळाली आणि विनीतच्या आईला नंडोरे येथील एका कारखान्यातून घेऊन अ‍ॅम्ब्युलन्स सिल्व्हासाकडे रवाना झाली. त्याच्यावर योग्य उपचार झाल्याने आता त्याची तब्येत सुधारत आहे.सकाळी शाळेत आल्यानंतर साप चावल्याचे विनीत ने सांगितले. त्यामुळे त्याला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.-शेख, शिक्षिका

टॅग्स :snakeसापpalgharपालघर