शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सर्पमित्रांना ओळखपत्र, प्रशिक्षणाची गरज

By admin | Updated: November 22, 2015 00:07 IST

सर्पप्रेमापोटी ओळखपत्र अथवा साप हाताळण्याचे प्रशिक्षण नसताना जीवावर उदार होऊन सापांना जीवदान देण्याचे कार्य गावोगावचे सर्पमित्र करतात. जीवाला धोका आणि कायदेशीर

बोर्डी : सर्पप्रेमापोटी ओळखपत्र अथवा साप हाताळण्याचे प्रशिक्षण नसताना जीवावर उदार होऊन सापांना जीवदान देण्याचे कार्य गावोगावचे सर्पमित्र करतात. जीवाला धोका आणि कायदेशीर आधार नसल्याने सर्पमित्रांवर टांगती तलवार असते. त्यामुळे वन विभागाने पुढाकार घेऊन सर्पमित्रांना प्रशिक्षित करण्याची मागणी वाढत आहे.रंग, आकार, लांबी, रुंदी इ. वैविध्यतेनुसार भारतात २७८ जातींचे साप आढळतात. यापैकी नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापटा, समुद्रसाप इ. विषारी जाती आहेत. पालघर जिल्ह्यात पसरलेल्या पश्चिम घाटातील वनसंपदा आणि अथांग समुद्रकिनारा इ. जैवविविधतेमुळे वाळ्यापासून अजगरापर्यंत सर्व प्रकारचे साप आढळतात. हिंदू धर्मात सापाला देव माणून पूजा केली जाते. मात्र, लोकवस्तीनजीक सापाचा वावर आढळल्यास मारण्याची प्रवृत्ती बळावते. तर, सर्पप्रेमापोटी काही युवकांनी घर, गोठा, उद्यान इ. ठिकाणांहून सापांना जीवदान देण्याचे कार्य गावोगावी सुरू केले आहे. डिस्क व्हरी वाहिनी आणि वन्यजीवरक्षक संस्थांच्या कार्याने प्रेरित केले आहे. साप पकडण्याचे ओळखपत्र नसल्याने कायदेशीर अडचण आणि साप हाताळण्याच्या प्रशिक्षणाअभावी अपघात घडून जीवावर उदार होण्याचा धोका आहे. गतवर्षी डहाणूतील महेंद्र पाटील (४५) या सर्पमित्राचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाला. जीव गेलाच, मात्र आर्थिक मदत पाटील यांच्या कुटुंबीयांना मिळाली नाही. दरम्यान, राज्य शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत वन्यव्यवस्थापन समिती स्थापन करून वृक्ष संवर्धनाच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. सदर समितीत दोन सर्पमित्रांची नेमणूक करून वन विभागामार्फत ओळखपत्र तसेच सापांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्यास कार्याला चालना मिळेल. प्रशिक्षित सर्पमित्र सापाची ओळख, घरात साप आल्यास काय करावे, सर्पदंश टाळणे, सर्पदंशाची लक्षणे, प्रथमोपचार इ. माहिती नागरिकांना देऊन जनजागृती करू शकतील. (वार्ताहर)डहाणू तालुक्यातून प्रतिदिन सरासरी दहा सर्पांना लोकवस्तीतून सर्पमित्रांनी सोडवण्याच्या अधिकृत नोंदी आहेत. लोकमतच्या पुढाकाराने वन विभागाकडून सर्पमित्रांना ओळखपत्र व प्रशिक्षण मिळाल्यास पथदर्शी घटना ठरेल.- धवल कसारा, संस्थापक, वाइल्ड लाइफ कन्झर्व्हेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन