शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

बुलडोझरवरच गावीत बसलेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 05:49 IST

वाढवण बंदराला प्रखर विरोध करणारे राजेंद्र गावित आता भाजापामध्ये गेले आहेत. पूर्वी वाढवण बंदर उभारल्यास बुलडोझरखाली प्रथम मी जाईन अशी भाषा करणारे ते आता वाढवण बंदर उभारणाऱ्या बुलडोझरवरच जाऊन बसले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील केली.

डहाणू : वाढवण बंदराला प्रखर विरोध करणारे राजेंद्र गावित आता भाजापामध्ये गेले आहेत. पूर्वी वाढवण बंदर उभारल्यास बुलडोझरखाली प्रथम मी जाईन अशी भाषा करणारे ते आता वाढवण बंदर उभारणाऱ्या बुलडोझरवरच जाऊन बसले आहेत, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील केली. येथील कॉँग्रेस भवनामध्ये शुक्रवारी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.ते म्हणाले की, अशा दलबदलू व्यक्तीवर किती व का विश्वास ठेवायचा. आता हे नंदुरबारचे पार्सल पुन्हा नंदुरबारला पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी शुक्रवारी डहाणू व जव्हार भागामध्ये दौरा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गावितांना कॉँग्रेसने मोठे केले मात्र ते उपकार विसरले. शिंगडा हेच एकमेव निष्ठावंत आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा, असे ते म्हणाले.तर, दिंवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या नावे शिवसेना व भाजपा हे दोन्ही पक्ष मतांचा जोगवा मागत आहेत. मग वनगांचा खरा वारसदार कोण, असा खोचक सवाल उपस्थित करून, आ. आनंद ठाकूर यांनी या वेळी सेना-भाजपाची खिल्ली उडविली.माजी पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले की, भाजपाकडून सध्या सत्तेचा दुरु पयोग सुरू आहे. भाजपा पैसा, सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंकत आहेत. त्यांचा फार काळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे फसवणूक करणाºया सरकारवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहनही नाईक यांनी या वेळी केले.या वेळी माजी मंत्री शंकर नम, माजी मंत्री मोघे, तालुका अध्यक्ष पांडुरंग बेलकर, जिल्हा उपाध्यक्ष बाबा जोशी, पालघर तालुका अध्यक्ष संजय पाटील आदींसह डहाणू तलासरी, पालघर भागातील काँग्रेस, तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.>शिवसेना म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळाजव्हार : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत जर आम्हाला भाजपाने विनंती केली असती, तर आम्हीही पुलुस विधानसभेसारखा निर्णय घेतला असता, या सेना भाजपाला फक्त श्रद्धांजलीचे राजकारण करायचे आहे. दोन्ही पक्ष सांगतात की, आम्हाला मत दिले, तर वणगांना श्रद्धांजली. मात्र, प्रत्यक्षात या दोघांना स्वत:च्या पक्षातला उमेदवार मिळत नाही, हे दुर्दैव आहे. शिवसेना हा सत्तारूपी गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून जव्हार येथील सनसेट येथे शुक्रवारीच जाहीर प्रचार सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी मार्गदर्शन केले.