शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीच्या मदतीने प्रेयसीचा काढला काटा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 00:20 IST

त्या दोघांनी प्रेमिकेवर जीवघेणा हल्ला केला त्यात ती बेशुद्ध झाली.

पारोळ : प्रेमिका आपल्या संसारात अडसर ठरू लागल्याने पतीने तिचा काटा पत्नीच्या मदतीने काढण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरला तो प्रेमिकेला सोबत घेऊन पत्नीसह तुंगारेश्वराच्या अरण्यात गेला व त्या दोघांनी प्रेमिकेवर जीवघेणा हल्ला केला त्यात ती बेशुद्ध झाली. परंतु ती मयत झाली असे वाटून पती,पत्नी तिला जंगलात सोडून पळून गेले. त्याच मार्गाने येत असलेल्या सदानंद महाराजांच्या भक्तांनी तिला आपल्या रिक्षात बसवून तिला जंगलातून खाली आणून तिचे प्राण वाचविले.नायगाव पूर्वेला असलेल्या परेरा नगरमध्ये राहत असलेल्या मनोहर शुक्ला याचे मागील काही वर्षांपासून महामार्गावरील नायगाव फाटा, बापाणे येथील महेंद्र चाळीत राहणाऱ्या नयना रामचंद्र महंत, २३ या महिले बरोबर प्रेमसंबंध होते. या संबंधात सर्व काही आलबेल असताना मागील काही महिन्यांपासून त्यांचे प्रेमसंबंध पत्नीसमोर उघड झाल्याने नयना त्यांच्या संसारात अडचण ठरू लागली होती. यामुंळे पत्नी पौर्णिमा व मनोहरमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे नयनाचा काटा काढण्याचे पती व पत्नीने ठरवून बुधवारी तिला देवदर्शन करायचे आहे, असे सांगून मनोहर व त्याच्या पत्नीने स्कुटीवर बसवून तुंगारेश्वरच्या पारोळ बाजूकडील सदानंद महाराज आश्रमाकडे जाणाºया रस्त्यावरून जंगलात नेले. घनदाट जंगलातील रस्त्याच्याकडेला असलेल्या एका निर्जनस्थळी स्कुटी थांबवून आपल्याला काही बोलायचे आहे, असे सांगून उतरलेल्या नयनाच्या अंगावर स्कुटी घालून जोरदार धडक दिली. या आकस्मिक घटनेत नयना खाली पडली. तिला त्याच स्थितीत झाडीत ओढून नेवून तिच्या डोक्यावर व अंगावर दगड घातला . यामुळे नयना गंभीर जखमी होऊन निपचित पडली. यामुळे ती मेली असल्याचे समजून मनोहर व प्रमिलाने तिची पर्स व मोबाईल घेऊन तेथून पोबारा केला. या घटनेनंतर रस्त्यावरून संध्याकाळच्या वेळेस श्री सदानंद महाराज आश्रमात गेलेले भाविक आपल्या घराकडे परतत असतांना कोणाच्यातरी कण्हण्याचा आवाज येत असल्याने ते त्या दिशेने गेले असता नयना दिसली. त्यांनी लागलीच आपल्या रिक्षामधून तिला खाली आणून पुढे रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले आहे. विरार ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.