शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार वारस रोजगारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 05:47 IST

महावितरणचा प्रताप : मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना केवळ साडेचार हजार वारसभत्ता

सुरेश लोखंडे

ठाणे : कर्तव्य बजावत असताना शॉक लागून किंवा पोलवरून पडून राज्यभरात महावितरणचे शेकडो कर्मचारी दगावले आहेत. त्यांच्या वारसांना वेळीच रोजगार उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. मात्र, जागा रिक्त असूनही दिवंगत कर्मचाºयांचे सुमारे एक हजार ६०४ वारस रोजगारापासून वंचित आहेत. त्यांना वारसभत्त्याच्या नावाखाली केवळ चार हजार ५०० रुपये मानधन दिले जात आहे. त्यासाठीही त्यांच्याकडून महिन्यातून १० दिवस काम करून घेतले जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

‘चुकीला क्षमा नाही’ असा काहीसा वीजउद्योग चांगलाच धोकादायक आहे. जुनी विद्युत यंत्रणा हेदेखील महावितरण कर्मचाºयांच्या अपघाताचे मूळ कारण असून त्यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर येत आहेत. शेकडो कामगार अपघातांत मरण पावले. महावितरणमध्ये पेन्शन योजना नाही. त्यामुळे घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यामुळे कामगारांच्या घरात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अपघातात शेकडो कामगार जायबंदी झालेले आहेत. त्यामुळे वीज कर्मचाºयांचे कुटुंबच उद्ध्वस्त होत आहे. त्यांना वारसभत्त्यातून तुटपुंजे मानधन दिले जात आहे. त्यासाठी १० दिवसांचे काम करून त्यांच्याकडून घेतले जात असल्याने मृत कर्मचाºयांच्या वारसांकडून संताप व्यक्त होत आहे.

हावितरण कंपनीच्या विविध विभागांत सुमारे २२ हजार ४३९ विविध प्रवर्गाच्या जागा रिक्त आहेत. या रिक्त जागी आर्थिक विवंचनेत असलेल्या वारसांना रोजगार देण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याचे महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे उपसरचिटणीस कॉ. विवेक महाले यांनी लोकमतला सांगितले. महावितरण प्रशासनाच्या मुख्य कार्यालयाच्या अखत्यारीतील विभागात सुमारे एक हजार ६०४ वारस नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रशासन व कामगारांच्या संयुक्त विद्यमाने वारसभत्ता योजना राबवण्यात येत आहे. त्यातून राज्यभरातील वारसांना केवळ साडेचार हजार रुपये मानधन दिले जात आहे.कायम नोकरी मिळवण्यासाठी जातात नऊ वर्षेच्महावितरण कंपनीच्या निष्काळजीमुळे राज्यभर शेकडो कर्मचाºयांचे अपघातांमध्ये निधन झाले. राज्यभरात सुमारे चार हजार २०० वारस अल्पशिक्षित व बेरोजगार आहेत. याशिवाय, काही वारसांचीअनेक वर्षांची प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. वारसप्रक्रियेसाठी किमान दीड वर्ष लागते. यानंतर, रोजगार दिलाच तर आधी साडे चार हजारांवर पाच वर्षे काम करावे लागते.च्तीन वर्षे कंत्राटी पद्धतीनुसार सात हजार ५०० रुपये याप्रमाणे वेतन दिले जाते. या सर्व प्रश्नांबाबत संपूर्ण महाराष्टÑातून संघटनेकडे अनेक तक्रारी आल्याची माहिती महाले यांनी दिली. या अन्यायास वाचा फोडण्यासाठी महाराष्टÑ राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे अध्यक्ष कॉ. पी.बी. उके, कार्याध्यक्ष कॉ. डी.बी. बौंडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडण्याचे नियोजन केल्याचे महाले म्हणाले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार