शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा खाडीपूल किती बळी घेणार? एक्स्प्रेसची धडक लागून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 00:20 IST

आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली.

पालघर : आपल्या मुलीच्या सासूच्या श्राद्धासाठी वैतरणा खाडीच्या पुलावरून पायी वाढीव गावात जाणाऱ्या रमेश माळी (४५, रा.खार्डी) यांना एक्स्प्रेसने उडवल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. शासन, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष अजून किती बळी घेणार अशी विचारणा वाढीववासी करत आहेत.वाढीव येथील बेबी बाई भोईर या १ आॅगस्ट रोजी पालघरमध्ये रुग्णालयात दाखल आपल्या मुलीला डबा घेऊन जात होत्या. वैतरणा खाडीवरील एकमेव मार्ग असलेल्या या रेल्वे ट्रॅक जवळच्या मार्गावरून जात असताना पाय घसरून त्या खाली पडल्या. त्यांचा मृतदेह ४ दिवसांनंतर अर्नाळा भागात सापडला. गुरुवारी त्यांचे दिवस श्राद्ध होते. त्यांच्याच श्राद्ध कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी सकाळी खार्डी गावातील रमेश माळी सकाळीच घरातून वाढीवला जाण्यासाठी निघाले. वैतरणा स्टेशन पुलावरून ते दोन रेल्वे ट्रॅकच्या मध्ये असणाºया मोकळ्या जागेतून वाढीवच्या दिशेने जात असताना मागून येणाºया सौराष्ट्र एक्सप्रेसने त्यांना हॉर्न दिला. यामुळे माळी खाली बसले. मात्र, अत्यंत वेगाने आलेल्या एक्स्प्रेसने त्यांच्या डोक्याला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अशा अपघाताच्या घटनांनी शेकडोंचा आकडा पार केला असून रेल्वे पूल अथवा पर्यायी मार्ग उभारण्याच्या त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अजून या शासनाला किती बळी हवेत असा उद्विग्न सवाल अमित पाटील यांनी उपस्थित केला आहे.पश्चिम रेल्वेच्या वैतरणा आणि सफाळे दरम्यान वैतरणा खाडीमध्ये वसलेले वाढीव-वैती पाडा हे सुमारे २ हजार लोकसंख्येचे गाव. २५-३० वर्षांपासून पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, व्यवसाय अशा महत्त्वपूर्ण समस्यांनी ग्रासलेले आहे. वाढीव गाव शासनाच्या महसूल विभागाच्या नोंदीवर असले तरी जगण्यासाठी लागणा-या साध्या मूलभूत सुविधा पुरविण्याचे स्वारस्य शासनाने दाखवलेले नाही. सुमारे २ हजार लोकसंख्येचे हे गाव किड्यामुंग्याप्रमाणे जीवन जगत आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार