शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील होरबिगर कंपनी व्यवस्थापन नमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:27 IST

उपोषणकर्त्या कामगारांच्या सर्व मागण्या मान्य : मान्यवरांच्या हस्ते उपोषण समाप्त

वाडा : तालुक्यातील वडवली- मुसारणे ग्रामपंचायत हद्दीतील होरबिगर इंडिया प्रेसिजन कंपनी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सोमवारपासून कंपनी प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. याबाबत तिसऱ्या दिवशी कंपनी व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेऊन अखेर उपोषणकर्त्या कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.निलंबित केलेल्या कामगारांना तत्काल कोर्टाच्या आदेशान्वये कामावर घेण्यात येईल, विनाकारण कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार व लेटरबाजी केली जाणार नाही. कामगारांचा मानसिक व शारीरिक छळ कधी केला जात नाही, यापुढेही केला जाणार नाही. कंपनी बंद केली जाणार नाही, प्रासंगिक पत्रव्यवहार उभयपक्षी स्वीकारला जाईल. कंपनीतील चालू स्थितीतील मशीन बाहेर नेल्या जाणार नाहीत, बंद स्थितीतील मशीन बाहेर नेताना युनियनशी चर्चा केली जाईल. कामगारांना भविष्य निर्वाह निधी नियमानुसार व कायदेशीर दिला जाईल. कंपनी मालकी हक्क व स्थलांतराबाबत आगाऊ माहिती देण्यात येईल, कामगारांशी चर्चा करून प्रश्न सोडविले जातील आदी मागण्या मान्य केल्या. तहसीलदार डाॅ. उद्धव कदम, कामगार आयुक्त किशोर दहिफळकर, सहायक कामगार आयुक्त संकेत कानडे, पोलीस निरीक्षक सुधीर संखे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाजी काठोळे, प्रशांत पाटील, कंपनी मॅनेजर संतोष देशमुख यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर लेखी आश्वासन देण्यात आले. मयूर लबडे, रुपेश पाटील, नवनाथ मोर, भक्तिदास भोईर, दीक्षा पाटील आदी उपोषणास बसले होते. व्यवस्थापनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनानंतर कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.