शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

होळी, धुळवडीवर पोलिसांची करडी नजर

By admin | Updated: March 12, 2017 02:09 IST

होळी-रंगपंचमीच्या दिवसात मुलींची छेडछाड, दारु पिऊन धिंगाणा, बळजबरीने पोस्त मागणे अशा प्रकारांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खास खबरदारी

वसई : होळी-रंगपंचमीच्या दिवसात मुलींची छेडछाड, दारु पिऊन धिंगाणा, बळजबरीने पोस्त मागणे अशा प्रकारांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी खास खबरदारी घेतली आहे. दोन दिवस पोलिसांची करडी नजर असणार असून गैैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. डीजे लावणे, फुगे फेकणे, पोस्त (वर्गणी) मागणे यावर बंदी घालण्यात आली असून १३ मार्चपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेशही लागू करण्यात आला आहे. होळी आणि रंगपंचमीचा सण लक्षात घेऊन जिल्ह्यात ठिकठिकाणी गस्त वाढवून नाकाबंदी सुरु केली आहे. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी गैरप्रकार होऊन हाणामारीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यासाठी जिल्ह्याभर पोलीस यंत्रण सतर्क झाली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातून नागरीकांना सण शांततेत साजरे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रंगाचा बेरंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. सध्या दहावी बारावीच्या परिक्षा सुरु असल्याने नागरीकांनी डीजे लावून धांगडधिंगा करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थी अभ्यासात गुंतले असल्याने त्यांना त्रास होईल असा डीजे लावण्यात आल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. मुलींची छेडछाड, दारु पिऊन आपापसात वाद होऊन भांडणे, रस्त्यावर उभे राहून पोस्त मागणे यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पाण्याने भरलेले फुगे आणि पिशव्या यामुळे एखाद्याला इजा पोचून, कायमचे अपंगत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे फुग्यांचा वापर टाळण्यात यावा असे आवाहन करणाऱ्या पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. त्यासाठी जादा पोलीस बळ तैनात करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या दिवशी समुद्रकिनारी मोठी गर्दी होत असल्याने त्याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे.लादलेत अनेक निर्बंधशक्यतो नैैसर्गिक रंग वापरावेत. चांगल्या प्रतीचे रंग वापरावेत. ओळखीच्या व्यक्तीलाच रंग लावण्यात यावा. अनोळखी व्यक्ती आणि महिलांना जबरदस्तीने रंग लावू नये. दारु पिऊन गाड्या चालवू नयेत. रस्त्यावर दारु पिऊन धिंगाणा घालू नये. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. होळी आणि रंगपंचमीचा सण शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी जिल्हयात मनाई हुकुम जारी केला आहे.