शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

होळी पेटवून सरकारविरोधात केला शिमगा

By admin | Updated: March 11, 2017 02:15 IST

जव्हार, मोखाडा आदी भागात रोहयो अंतर्गत पुरविण्यात आलेल्या कामाची तीन महिन्यापासून मजुरीच मिळाली नसल्याने स्थलांतर आणि कुपोषण रोखण्याचा बडेजाव

- हितेन नाईक,  पालघरजव्हार, मोखाडा आदी भागात रोहयो अंतर्गत पुरविण्यात आलेल्या कामाची तीन महिन्यापासून मजुरीच मिळाली नसल्याने स्थलांतर आणि कुपोषण रोखण्याचा बडेजाव मिरविणाऱ्या निष्क्रीय प्रशासनाच्या कारभाराचा आणि असंवेदनशील धोरणाचा निषेध करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पाच तहसीलदार कार्यालयावर आज "पोसद मोर्च्या"चे आयोजन करण्यात आले होते.पालघर जिल्ह्यातील आदिवासी दिवसेंदिवस दारिद्र्याच्या अंधारात लोटला जात असून त्यांच्या उदरिनर्वाहा साठी एकमेव पर्याय म्हणून रोजगार हमी योजने कडे पिहले जाते.शासन,प्रशासना कडून रोहयो अंतर्गत कामे काढली जात असल्याचे सांगितले जात असले तरी अल्प दर आणि वेळेवर न मिळणारा पगार ह्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील लोक नाईलाजाने शहरी भागात स्थलांतर करून मिळेल ते काम स्विकारीत आहेत.ह्या आदिवासी बहुल भागात कुपोषण नसून रोजगार हमी योजनेची कामे हि प्रभावी पणे राबवली जात असल्याचा डांगोरा शासन पिटत असला तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक मजुरांना डिसेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 ह्या कालावधीत केलेल्या कामाचे आजही पैसे मिळालेले नाहीत.एकी कडे काम देऊनही मजुरी मजुरी देत नाही,तर दुसरी कडे कामाची मागणी करूनही काम दिले जात नाही. एकट्या विक्र मगड तालुक्यात 755 मजुरांनी कामाची मागणी करूनही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.आदिवासी समाजात होळीचा सणाला खूप महत्व असते अश्या वेळी चार मिहन्याचा पगारचा झाला नसल्याने हजारो कुटुंबावर उपासमारीची पाळी ओढवली आहे. म्हणून सरकारला सुबुद्धी मिळावी, आणि ह्या भागातील भ्रष्टाचार, गैरकारभार, गरिबांची भूक, सरकारची असंवेदनशिलता होळीत भस्म व्हाव्यात ह्या साठी पालघर, विक्र मगड, जव्हार, मोखाडा व वाडा ह्या पाच तहसीलदार कार्यालया समोर होळी पेटवून आणि प्रतीकात्मक बाहुले बनवून निषेध व्यक्त करण्यात आला. ह्यावेळी स्वत: संस्थापक विवेक पंडित, सर्व तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी त्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने तहसीलदारांना दिले.