शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

रसायनसदृश पिशव्यांचा ट्रक ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 06:09 IST

नमुने पृथक्करणासाठी पाठविले : अहवाल प्राप्त झाल्यानंतर एमपीसीबी करणार कारवाई

बोईसर : टेम्पो ट्रक मधून बाहेर नेण्यात येणाऱ्या प्लास्टिक कचरायुक्त गोणीला चिकटलेले रसायन सदृष्य व रंगीत पदार्थांनी माखलेल्या प्लास्टिक पिशव्यांचे नमुने बोईसर पोलीस ठाण्याच्या आवारात उतरविण्यात आले आहे. हा ट्रक रिकामा करुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याचे नमुने परिक्षणासाठी संकलित केले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई बाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी लोकमतला सांगितले.

तारापूरच्या लुपिन लि. या औषध कारखान्यातील प्लास्टिकचा कचरा टेम्पो ट्रक मधून चालल्याची तक्र ार बुधवारी संध्याकाळी म. प्र. नि. मंडळाच्या ठाणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी मधुकर लाड यांना प्राप्त झाल्या नंतर ट्रक बोईसर पोलीस ठाण्यात आणून आतील भंगार युक्त प्लास्टीक व इतर सामानाची पाहणी करण्यात आली. या तपासणीत ३२०० किलो प्लास्टिक कचरा धारावी मुंबईला नेण्यात येत असल्याचे उघड झाले. त्या मधील बहुतांश प्लास्टिक गोणी, रासायन सदृष्य पदार्थांनी माखलेले आढळून आल्या तर बहुतांश प्लास्टिक गोणीत रबरी हॅण्डग्लोज भरलेले होते. त्याच बरोबर काही प्लास्टिकच्या गोणी मध्ये चिकटलेले नारंगी, पांढºयाव पिवळ्या रंगाची पदार्थाने माखलेल्या प्लास्टिक पिशव्यां होत्या त्या मधील नमुने संकलित करून ते तक्रारदार व पोलीस उपनिरीक्षक संदीप पोमण उद्योगांचे प्रतिनिधी सर्जेराव पाटील यांच्या समक्ष साक्षांकित करून मोहर बंद केलेले आहेत या पाहणीच्या वेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर - १ चे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर क्षेत्र अधिकारी नंदिकशोर पाटील उपस्थित होते.लुपीन लि. या औषध तयार करणाºया कारखान्यातून कंन्टामेंटल वेस्ट बॅग, इंडस्ट्रीयल पॅकेझीन मटेरियल, हॅण्डग्लोज इत्यादी वस्तू ट्रक मध्ये भरून मुंबईतील धारावी येथे नेण्यात येत होत्या. तक्र ार प्राप्त होताच त्या ट्रकमधील सर्व वस्तू खाली उतरवून काही प्लास्टिक बॅगला चिकटलेल्या रसायन सदृष्य पावडर गोळा करून पृथक्करणासाठी पाठविण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल- मधुकर लाड , प्रादेशिक अधिकारीमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणेया गाडी मधून जे काही प्लास्टिक बॅग, पुठ्याचे तुकडे, एम एस टिन इत्यादी मिक्स वेस्ट मान्यता प्राप्त व्हेंडर तर्फे पाठविले जात होते. ती गाडी संपूर्ण आमच्या समक्ष रिकामी केली असता तपासणी अंती असे निदर्शनास आले की, अशत: फक्त ठराविक भागाला कच्चा मालासारखे चिकटलेले पदार्थ आढळले. तसेच हे प्लास्टिक मान्यता प्राप्त व्हेंडरला पाठविले जात असून तो व्हेंडर (खरेदी करणारा) त्यांच्याकडे एमपीसीबी ची मान्यता (कंसेंट) आहे. त्यामुळे गाडी सोबत कागदपत्र आहेत.- भुपेश घरत, डी.जी.एम. लुपिन लि.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPlastic banप्लॅस्टिक बंदी