तलासरी : महावितरणने तलासरी भागात बिल वसुली व वीज चोरांविरुद्ध मोहीम आखली असून कोचाई पाटीलपाडा येथे त्यांनी घरातील व शेतपंपाची वीजचोरी पकडली असता त्यांना वीजचोरी करणाऱ्यांनी बेदम मारहाण केली याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मारहाणी नंतर वीज कर्मचारी यांनी काम बंद आंदोलन पुकारले कोचाई पाटील पाडा येथील वसंत रामा पागी यांच्या घरातील वीज चोरी कर्मचाऱ्यांनी पकडली तसेच बाबू नवशा दादोडा याने शेतातील पंपाला चोरीची वीज वापरली जात होती ती पकडून पंप जप्त केल्यावर चिडलेल्या बाबू नवश्या दादोडा याने वीज कर्मचारी प्रमोद सिद्दाम माडे यास मारहाण करून पुन्हा इकडे आल्यास हात पाय तोडीन, अशी धमकी दिली. या भागात जवळ पास ६५ टक्के वीजचोरी होत आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान होत असून वीजचोरी मुळे लोड शेडींग लादावे लागते. (वार्ताहर)
वीज कर्मचाऱ्याला तलासरीत मारहाण
By admin | Updated: January 13, 2017 05:53 IST