शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तहान भागवण्यासाठी गुरांचे कळप समुद्राकडे

By admin | Updated: May 10, 2016 01:50 IST

उन्हाच्या झळा तीव्र होऊन चारा-पाण्यासाठी गुरांची दमछाक होत आहे. गावातले जलसाठे कोरडे पडले असून, गुरे तहान भागविण्यासाठी समुद्रात आशेने जात

अनिरुद्ध पाटील,  बोर्डीउन्हाच्या झळा तीव्र होऊन चारा-पाण्यासाठी गुरांची दमछाक होत आहे. गावातले जलसाठे कोरडे पडले असून, गुरे तहान भागविण्यासाठी समुद्रात आशेने जात असून ते प्रदूषित, क्षारयुक्त पाणी पिण्या योग्य नसल्याने त्यांचीही निराशा होत आहे.महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मे महिन्यातील एक-एक दिवस उलटत असताना डहाणू तालुक्यातील पाणी टंचाईही भीषण बनत चालली आहे. या वर्षी विहिरी तसेच कूपनालिकाच्या पाण्याने तळ गाठला आहे त्या पाण्यातील क्षारांचे प्रमाणही वाढले आहे. माणसांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची परिस्थिती ओढवली असताना जनावरांचा चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. बोर्डी परिसरातील नरपड, चिखले, घोलवड, रामपूर, झाई या गावातील तलावाचे पाणी आटले असून हिरवट व दुर्गंधीयुक्त पाणी पिणे गुरांनाही अशक्य झाले आहे. बहुसंख्य गावात राखीव गावराने व गुरचरण नाही. अस्तीत्वात असलेल्या गावातील क्षेत्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे.