शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससीत वाड्याचा हेमंता पाटील कोकण विभागात पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:52 IST

देशात ३९ वा तर महाराष्ट्रात पाचवा : वडील शिक्षक, आई दहावी पास तरीही आश्रमशाळेतील शिक्षणाच्या जोरावर मेहनत करून प्राप्त केले सुयश

- वसंत भोईर

वाडा : पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील शिलोत्तर (पीक) या खेडेगावातील एका शिक्षकाचा मुलगा हेमंता केशव पाटील हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) २०१८ मध्ये झालेल्या नागरी सेवा परीक्षेत संपूर्ण कोकण विभागात पहिला आला आहे. तर संपूर्ण देशात ३९ वा व महाराष्ट्रात पाचव्या क्र मांकाने उत्तीर्ण झाला आहे. त्याचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

पालघर जिल्ह्यात वाडा तालुका हा शैक्षणकि दृष्टीने अग्रेसर मानला जात असून या पूर्वी (सन २०१२) याच तालुक्यातील चिन्मय प्रभाकर पाटील (रा. पीक) व यतिश गजानन पाटील (रा. कासघर ) या दोन विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. विशेष म्हणजे हेमंता पाटील यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण तलासरी येथील ठक्कर बाप्पा आश्रम शाळेत झाले आहे व ११ वी ते १२ वीचे शिक्षण वाडा येथील आ.ल. चंदावरकर या कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. या महाविद्यालयात बारावीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी रायगड जिल्ह्यातील लोणेर येथे केमिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तेथेही तो गोल्ड मेडालिस्ट ठरला.

हेमंताने गुजरात मधील अंकलेश्वर येथे नोकरी करीत असताना मागील वर्षी युपीएससी परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो देशात ६९६ रँकमध्ये येऊन तो आय. आर. एस. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस या स्ट्रीममध्ये तो यशस्वी ठरला होता. मात्र हेमंत तेथेही न थांबता त्याने पुन्हा कठोर मेहनत करु न पुन्हा परीक्षा दिली आणि आता तो देशात ३९ वा तर राज्यात पाचवा व कोकण विभागात पहिला यशस्वी ठरला आहे.हेमंताचे वडील केशव पाटील हे साध्या शेतकरी कुटुंबातील असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत.हेमंताची आई गृहीणी असून ती अवघी दहावी पर्यंत शिकलेली आहे. दरम्यान हेमंताच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. त्याच्या वडीलांनी तलासरीसारख्या आदिवासी भागात शिक्षकी पेशा पूर्ण करुन आपल्या मुलांना संस्कार व शिक्षण दिल्यामुळेच हे यश नातवाने मिळविले असे आजोबा दत्तात्रेय यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार