शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

बिलाचा आकडा ऐकून रुग्णाने ठोकली रुग्णालयातून धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:40 IST

विरारमधील घटना : विजय वल्लभ रुग्णालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. अशातच सरकारी रुग्णालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नाहीत म्हणून काही नागरिक खाजगी रुग्णालयांकडे उपचारासाठी वळतात, मात्र काही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले लावून रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याने रुग्णांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाने कोरोनाग्रस्त रुग्णालादीड लाखांचे बिल आकारल्याने बिलाचा आकडा ऐकूनच रुग्णाने रुग्णालयातून धूम ठोकल्याचा प्रकार घडला आहे.विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रु ग्णालयात १२ जुलै रोजी एक कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल झाला होता. पाच-सहा दिवस उपचारांनंतर रु ग्णाची तब्येत सुधारल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्याचे ठरले. या वेळी ५-६ दिवसांच्या उपचाराचे बिल दीड लाखाच्या घरात आल्याचे समजताच रुग्णाने हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे, सांगत रुग्णालयातूनच पळ काढला. डॉक्टरांनी या रुग्णाला फोन केल्यानंतर मी सर्वांना बाधित करेन, अशी धमकी रुग्णाने डॉक्टरांना दिली आहे.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या रु ग्णाचा शोध सुरू आहे. या आधीही महाराष्ट्रात अनेक रु ग्ण उपचारादरम्यान हॉस्पिटलमधून पळून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुसरीकडे वसई-विरारमध्ये सलग चार महिन्यांपासून कोरोनामुळे असलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. हातचे रोजगार, कामधंदा ठप्प असल्याने रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यमवर्गीय नागरिकांसमोर तर इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.वसई-विरारमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये चांगले उपचार होणार नाहीत, या भीतीपोटी अनेक लोक खाजगी रुग्णालयांना पसंती देतात, मात्र कोरोनावर खाजगी रुग्णालयांत उपचार घेणाºया सर्वसामान्य मध्यमवर्गीय रुग्णांची अवस्था बिकट झालेली आहे. कोरोनासारख्या आजारावर रुग्णालये आकारत असलेली अव्वाच्या सव्वा बिले हा संतापाचा विषय ठरत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी लाखो रुपये आणायचे कोठून? असा सवाल नागरिकांकडून सातत्याने विचारला जात आहे.