शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

हत्तीपाडा रस्ता गेला वाहून; निधी पाण्यात"

By admin | Updated: July 3, 2017 06:05 IST

वसई पूर्व भागातील थळयाचा पाडा वरून हत्तीपाडा येथे जाण्यासाठी यंदा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सहा लाख निधी खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कपारोळ : वसई पूर्व भागातील थळयाचा पाडा वरून हत्तीपाडा येथे जाण्यासाठी यंदा जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सहा लाख निधी खर्च करून तयार केलेला पक्का रस्ता पहिल्या पावसातच धुवून गेल्याने शासनाचे सहा लाख रुपये पाण्यात गेले आहेत.हा रस्ता जंगलातून जात असल्याने माती रस्त्यावर येऊन चिखल होत असल्याने या पाड्यातील विद्यार्थी व रु ग्ण यांना मोठा फटका बसत होता. गावात प्रवाशी वाहन जावू न शकल्याने त्यांना पायीच प्रवास करावा लागत आहे. हत्तीपाडा येथे मोठा बंधारा असल्याने पर्याटकांची रेलचेल या ठिकाणी नेहमी असते. या ठिकाणी पर्याटनाला चालना व पाड्यातील नागरिकांची गैर सोय दूर करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात सहा लाख निधी खर्च करून पक्का रस्ता तयार केला. परंतु, पहिल्याच पावसातच डांबर वाहून गेल्याने आतील खडी व माती वर आली आहे. वसई पूर्व भागात या वर्षी करण्यात आलेल्या आडणे, मेढा, अंबोडे या ठिकाणी केलेल्या रस्त्याच्याकामांचा दर्जा ही निकृष्ठ असल्याचे पहिल्या पावसातच समोर आले आहे. या रस्त्याचे काम करत असताना वापरण्यात येणाऱ्या डांबरात खराब इंजिन आॅइल चा वापर ठेकेदार करीत असल्याचा आरोप नागरीक करत असून नागरिकांची गैर सोय झाली तरी चालेल, शासनाचा निधी वाया गेला तरी चालेल पण ठेकेदार जगला पाहीजे या धर्तीवर जिल्हा परिषद अभियंते काम करीत असल्याचा सुर या भागात उमटत आहे.