शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हातणेचा मुंगूर मत्स्य प्रकल्प अखेर बंद

By admin | Updated: February 1, 2017 02:56 IST

हातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारा व देहर्जा नदीला प्रदूषित करणारा मुंगूर मत्स्य प्रकल्प बंद करण्याचे व त्यातील मत्स्यसाठा नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- राहुल वाडेकर,  विक्र मगडहातने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारा व देहर्जा नदीला प्रदूषित करणारा मुंगूर मत्स्य प्रकल्प बंद करण्याचे व त्यातील मत्स्यसाठा नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आमीन फार्म प्रा. लि. च्या सात तलावामध्ये मुंगुर मशांचे पालन व उत्पादन घेतले जात होते. त्यातील माशांना खाद्य म्हणून कोंबडीची सडलेली आतडी, कुजलेले मांस टाकले जात असल्यामुळे गावामध्ये तसेच आजूबाजूलला दुर्गंधी पसरत होती. हे दूषित पाणी सोडले जात असल्याने देहर्जा नदी दूषित होत होती. त्यामुळे आजू-बाजूच्या गावामध्ये रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. या तलावांमधील दूषित पाण्यामुळे डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली होती. याबाबचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्याने हा आदेश जारी झाला आहे. या बाबत ग्रामपंचायतीने या फार्मच्या मालकाला नोटिस बजावूनही तिच्याकडे दुर्लक्ष करून उत्पादन सुरूच ठेवले. याबाबत येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी सरकारी पातळीवर निवेदन व पाठपुरावा केला. त्यानंतर आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकासाहित चौकशी करून त्याबाबतच्या अहवालात या मस्त्य प्रकल्पाने आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा ठपका ठेवला होता. या बाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त व तहसीलदार यांनी चौकशीचे आदेश दिले. मंगूर हे मांसाहारी असल्याने भारतीय मासळीच्या प्रजाती नामशेष होणार असल्याने मुंगूरचे संवर्धन, पणन यास प्रतिबंध करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार हा प्रकल्प त्वरित बंद करण्याचे आदेश सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय पालघर (ठाणे) यांनी दिले आहेत. जर हा प्रकल्प बंद न केल्यास कायदेशीर कार्रवाई केली जाईल असा उल्लेख या अहवालात केला आहे. मुंगूर माशाच्या प्रकल्पातील दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. हे पाणी देहर्जा नदीच्या पात्रात सोडले जायचे त्यामुळे नदीही दूषित व्हायची. हा प्रकल्प बंद व्हावा म्हणून आम्ही शासनाकडे ग्रामपंचायतस्तरावरून वेळो-वेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र याबाबत शासनाकडून कुठली ही कारवाई केली जात नव्हती. अखेर हा प्रकल्प बंद करण्याचे आदेश आज आले आहेत.-नंदीनी डोले, सरपंच, देहर्जा, हातणे ग्रामपंचायात

गावात माशांचे, डासांचे प्रमाण वाढले होते. या बाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणेने चौकशी केली व या प्रकल्प बंद केला हे उत्तम झाले. -नितिन डोले, ग्रामस्थ, हातने गाव