बोईसर : तारापूरअणुऊर्जा प्रकल्प तीन व चारच्या उभारणीनंतर विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी आपल्या विविध मागण्यांकरीता तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहती वसाहतीवर हंडा मोर्चा नेऊन सुमारे चार तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर पालघरचे तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी येऊन निवेदन स्वीकारले व मागण्या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. काढण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त कामगारांना त्वरीत कामावर घेणे, अक्करपट्टी व पोफरण या दोन्ही पुनर्वसित गावांची पाणीपुरवठा योजना सुरळीत करावी, नवीन बी. ए. आर. सी. प्रकल्पात पोफरण व अक्करपट्टी प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने रोजगार मिळावा, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या शाळेमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना तसेच प्रकल्पाच्या पाच कि. मी. परिघातील मुलांनी विनामूल्य प्रवेश देण्यात यावा, या मागण्यांकरीता पास्थळच्या पेट्रोल पंपापासून अणुऊर्जा केंद्र कर्मचारी वसाहतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. (वार्ताहर)प्रकल्प उभारताना आश्वासनांची उधळण व खैरात होत होती परंतु आता आमचा कुणीही वाली नसून आमची घरेदारे गेली. शेतजमिनी गेल्या. पारंपारीक मच्छीमारी करून उदरनिर्वाह करण्यास हातभार लावणारे समुद्र किनारेही गेले आणि आता प्रकल्पात नोकरीही नाही. आता आम्ही कसे जगायचे? हा प्रश्न प्रकल्पग्रस्तांनी विचारला आहे.
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचा विविध मागण्यांसाठी हंडामोर्चा
By admin | Updated: March 29, 2016 03:01 IST