शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गटारांची झाकणे बनली जीवघेणी; डहाणू नगर परिषदेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:19 IST

पर्यटक वावरतात जीव मुठीत घेऊन

अनिरुद्ध पाटील बोर्डी : डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गालगत पारनाका या पर्यटनस्थळानजीक गटारांच्या चेंबरची १० ते १२ झाकणं फुटल्याने पर्यटकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागते आहे. याबाबत स्मारणपत्र देऊनही नगर परिषद लक्ष घालीत नसल्याचा आरोप नगरसेविका श्वेता संजय पाटील यांनी केला आहे.

या नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ अंतर्गत पारनाका येथील के. एल. पोंदा हायस्कूल परिसरात ही १० ते १२ झाकणे फुटली असल्याचा प्रकार नगरसेविका श्वेता पाटील यांनी स्मरण पत्राद्वारे समोर आणला. मात्र या गंभीर बाबीकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. हा पर्यटनाचा हंगाम असून येथील पारनाका चौपाटी या काळात पहाटेच्या जॉगिंगपासून ते मध्यरात्रीपर्यंत गजबजलेली असते.

हा प्रमुख राज्य मार्ग असल्याने गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या हजारो वाहनांची वर्दळ असते. शिवाय कोर्ट, पंचायत समिती, उप वन संरक्षक कार्यालय आणि पुढे उप जिल्हा रुग्णालय असल्याने हा भाग गर्दीचा आहे. त्यामुळे अपघात घडून जीवितहानी होण्याचा धोका संभवतो. शिवाय १५ जूनपासून शाळा-महाविद्यालयाच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होत असल्याने नर्सरीपासून ते एचएससीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतील. दरम्यान मान्सून दाखल होण्यापूर्वी झाकणं बसविणे आवश्यक असून तसं न झाल्यास पादचाऱ्यांना नाहक जीवाला मुकावे लागू शकते. त्यामुळे तातडीने कार्यवाही अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

पारनाका समुद्रकिनारी फेरीबोट उलटून तीन विद्यार्थिनींना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे हा परिसर ओळखला जातोय. पुन्हा येथे झाकणं विरहित चेंबर मध्ये पडून जीवितहानी झाल्यास या पर्यटनस्थळाला कु प्रसिध्दी लाभू शकते. ते टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.

सदर समस्येबाबत नगरपरिषदेला स्मरणपत्र द्यावे लागणे हा दुर्दैवी प्रकार आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कार्यवाही अपेक्षति आहे.- श्वेता पाटील (नगरसेविका, डहाणू नगर परिषद)