शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे कृषीशास्त्रज्ञांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 02:30 IST

योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शेत पिकाचे संरक्षण आणि उत्पादन विक्रीच्या मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांना बेजार केले. दरम्यान, कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने सोशल मीडियाचा खुबीने वापर केल्याने शेतकऱ्यांना घरबसल्या मार्गदर्शन मिळते आहे. लॉकडाऊनमुळे शेतकºयांपुढील अडचणी वाढल्या आहेत. शेतपिकांचे कीड - रोगापासून संरक्षण तसेच संवर्धन, तसेच योग्य खत व्यवस्थापनाद्वारे उत्पादन वाढीसाठी कृषी सल्ल्याची आवश्यकता असते. सध्याच्या कोरोनाच्या काळातही उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी मार्गदर्शनाची नितांत गरज आहे.दरम्यान, जिल्ह्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुक्यातील कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. या संचारबंदीच्या काळात शेतकºयांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर अधिक भर दिल्याची माहिती प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव यांनी दिली. त्यानुसार शेतकºयांनी सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवून शेतीची कामे करताना तोंडाला मास्कचा वापर, सॅनिटायझरचा उपयोग याविषयी आकाशवाणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्यामुळे पिकांची तोडणी, वर्गवारी आणि निर्यात करताना योग्य खबरदारी घेतल्याची माहिती शेतकºयांनी दिली.पीक संरक्षणतज्ज्ञामार्फत जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या चिकू, आंबा आणि अन्य भाजीपाला पिकावर कधी कीटकनाशकाची फवारणी करावी याची माहिती दिली जाते. जव्हार, मोखाडा, वाडा, तलासरी आणि डहाणू येथील शेतकºयांना बांधावर मार्गदर्शन देण्याची जबाबदारी कृषीतज्ज्ञ चोख बजावत आहेत.यासाठी त्यांच्याकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला जात आहे. जिल्ह्यातील विविध शेतकºयांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये शास्त्रज्ञांना जोडले आहे, वेळप्रसंगी नवीन ग्रुपची निर्मिती झाली आहे. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी व्हिडिओ कॉलिंगचा पर्यायही स्वीकारला जातो.>संचारबंदी असल्याने शेतमाल निर्यातीचे परवाने, शहरातील बाजारपेठांचे नियोजन समजावून घेणे शक्य झाले. त्यामुळेच काही उत्पादक या काळात स्वत: निर्यातदार आणि विक्रेताही बनले. या केंद्राच्या गृहविज्ञानतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली महिला शेतकरी गटातील सदस्यांना मास्कनिर्मितीचे तंत्र शिकवून आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. हे करताना मालाची आॅर्डर घेण्याचे कामही केंद्रामार्फत केले जाते.