शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पालकमंत्र्यांना जिल्ह्यासाठी वेळच नाही

By admin | Updated: September 3, 2015 02:44 IST

पालघर नावापुरताच जिल्हा झाला, मात्र अजून कुठलेही व्हिजन नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा बरा होता असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे.

पालघर : पालघर नावापुरताच जिल्हा झाला, मात्र अजून कुठलेही व्हिजन नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा बरा होता असे म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे. पालघरच्या विकासासाठी आमच्या पालकमंत्र्यांना वेळच मिळत नसल्याची खंत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे व्यक्त केली.ते म्हणाले की, वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे औत्सुक्य राष्ट्रीय पातळीवर निर्माण झाले होते. या निवडणुकीत सर्व जातीधर्माच्या, विविध स्तरावरील उमेदवारांना उमेदवारी दिली. कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळेच आम्ही एकहाती सत्ता मिळवू शकलो. पालघरमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे आम्ही दाखवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. पालघरची पोट निवडणूक जिंकायची असेल तर नको ती आश्वासने देत मतदारांची फसवणूक करणारा कार्यकर्ता मला नको तर वास्तविकतेचे भान ठेवून स्वत:ला कार्यात झोकून देणारा कार्यकर्ता हवा. नवनिर्मित पालघर जिल्ह्णाच्या समस्यांबाबत किती दिवस ओरडत बसाल त्यापेक्षा उपलब्ध परिस्थितीशी सामना करून पुढे जायला हवे. पालघरच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. विकासात्मक कामे मतदारापर्यंत पोहचवली तर आपल्याला यश नक्कीच मिळेल असा विश्वास माजी महापौर राजीव पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी पालघरच्या विठ्ठल रखुमाई सभागृहात पार पडली. यावेळी माजी महापौर राजीव पाटील, आ. विलास तरे, ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील, माजी आ. मनिषा निमकर, प्रविण राऊत, सुभाष तामोरे, प्रशांत पाटील, सुरेश तरे इ. मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात बविआच्या पदाधिकाऱ्यांची निवड व पालघर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमिवर कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी सर्व वरिष्ठांची बैठक आयोजित केली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी बविआत प्रवेश केला. (वार्ताहर)