शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये वाढतेय गुलाबी थंडी

By admin | Updated: February 6, 2016 02:03 IST

पालघर जिल्हातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आणि पर्यटन स्थळ व एैतिहासीक वारसा लाभलेल्या जव्हार शहरात गुलाबी थंडीची लहर सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासु

जव्हार : पालघर जिल्हातील थंड हवेचे ठिकाण म्हणून आणि पर्यटन स्थळ व एैतिहासीक वारसा लाभलेल्या जव्हार शहरात गुलाबी थंडीची लहर सुरू झाल्याने गेल्या काही दिवसांपासुन जव्हार शहरात सायंकाळच्या वेळेस थंडी जोर पकडत आहे. जव्हार तालूका हा घनदाट जंगल-दऱ्याखोऱ्यातील, अतिदुर्ग भाग असल्यामुळे येथे थंडी चांगलीच जाणवते. त्यामुळे येथील व्यापारी बंधुंनी तसेच फेरीवाल्यांनी थेट लुधियाना शहरातून लोकरीचे, रेग्जीनचे स्वेटर, शाल, कंबल, मफलर, कानटोपी, माकडटोपी इत्यादी व्हराईटीचे उबदार कपडे बाजारात विक्रीसाठी आनले आहेत. तसेच काही फेरीवाल्यांनी आपले दुकान चक्क रस्त्यांवर मांडून व्यवसाय करीत आहेत. ग्रामीण आदिवासी भाग असल्यामुळे या फुटपाथवरील दुकानांवर खरेदीकरीता खेडोपाड्यातील बांधवांची गर्दी दिसुन येते. जव्हार शहरातील भाग शाळेसमोर, मेमन मार्केट, व एस. टी. स्टॅन्ड रोडवरील व्यापाऱ्यांकडे आप आपल्या सोयीनुसार लहान मोठे स्वेटर, कोट, शाल, मफलर खरेदीची लगबग सुरू झालेली आहे. यावर्षी व्यापारी वर्गाने वेगवेगळे लोकरीने विणलेले चमकदार, दर्जेदार लेडीज-जेन्टस् स्वेटरचे प्रकार बाजारात विक्रीसाठी आणलेले आहेत. यात लहान मुलांचे-मुलींचे स्वेटर रू. ७०/- ते ७००/- पर्यत तर मोठे मुला-मुलींचे स्वेटर रू. १६५/- ते ९६०/- रूपयांपर्यत तसेच लेदर मधील कोट हे लहान व मोठे रू. १८५/- ते १०००/- पर्यत बाजारात उपलब्ध आहेत. रात्रीच्या वेळेस लोक घराबाहेर छोटी मोठी शेकोटी करताना दिसत आहेत. आजू बाजूला पडलेल्या सुक्या फाट्या, गवत, गोणपाट इत्यादी वस्तूचे वापर करून शेकोटी करतांना लोक दिसत आहेत.