शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘सफेद जांबू’ या परदेशी फळझाडाची वाढती क्रेझ; मुंबई बाजारात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 23:14 IST

उत्पन्नात वाढ

अनिरुद्ध पाटीलबोर्डी : विसाव्या शतकाच्या प्रारंभी डहाणू तालुक्यातील घोलवड गावात राहणाऱ्या पारसी कुटुंबीयांनी सफेद जांबू या परदेशी फळझाडाची प्रायोगिक तत्त्वावर लागवड त्यांच्या बागायतीत केली होती. घोलवड गावच्या टोकेपाडा येथील शेतकरी विनेश खोत यांचे पंजोबा सोमला रामा खोत यांनी १९४५ ते ५० सालाच्या दरम्यान पारसी व्यक्तींकडून टोकेपाडा येथील जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फळे देणारी सफेद जांबूची पाच-सहा झाडे होती.  

या फळांची चव आवडल्याने आणि उत्पादनही चांगले येऊ लागल्याने खोत यांनी काही रोपांची लागवड केली. याच काळात घोलवड, बोर्डी आणि डहाणूतील विविध भागात स्थानिक शेतकऱ्यांनी लावलेली झाडे जोमाने वाढली होती. विनेश यांचे आजोबा गोवन आणि वडील बंडू यांनीही या झाडांच्या लागवडीत भर घातली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत  विनेश यांच्याकडे दीडशेहून अधिक लागवड आहे.मुख्य म्हणजे या झाडाची लागवड आंतरपीक म्हणून  चिकू, नारळ यांच्या फळबागेत केली जाते. या पिकाला मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी काळी सुपीक जमीन आणि दमट हवामान पोषक आहे. विशेषत: किनाऱ्यालगत या झाडाची वाढ जोमाने होऊन लागवडीपासून चौथ्या वर्षी फलधारणा होते. 

डहाणू तालुक्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील विविध भागात या पिकाचे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. पूर्वी केवळ सफेद रंगात उपलब्ध असणारे हे फळ आज लाल, हिरवे, फिके व गडद गुलाबी या रंगात उपलब्ध झाले आहे. कमी उत्पादन खर्चात भरघोस पीक हे या पिकाचे खास वैशिष्ट्य आहे. 

केवळ या झाडांचीच बागायती करायची झाल्यास, दोन झाडांमध्ये दहा फुटांच्या अंतरातही पीक चांगले येत असल्याने कमी जागेत जास्त झाडे लावून अधिक उत्पादन घेता येते. पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून किमान दीड हजाराचे उत्पन्न मिळते.  तालुक्यात या झाडाची लागवड दोनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर झाली आहे. डिसेंबर ते मे हा या फळांचा हंगाम असतो. या काळात तीन वेळा बहार येतो. अति थंडी व उष्णतेमुळे फळगळती होते. अवकाळी पाऊस, वादळ इ. नुकसानीचा सामना करावा लागतो. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार