शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आराखडे मान्यतेसाठी १५ आॅगस्टला ग्रामसभा

By admin | Updated: July 29, 2016 02:49 IST

पालघर जिल्ह्यात आमचा गाव-आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय तयार करावयाच्या विकास आराखड्याना येत्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत मान्यता मिळणार असून जिल्हा

- हितेन नाईक/निखिल मेस्त्री,  पालघर/नंडोरे

पालघर जिल्ह्यात आमचा गाव-आमचा विकास अंतर्गत ग्रामपंचायतनिहाय तयार करावयाच्या विकास आराखड्याना येत्या १५ आॅगस्ट रोजीच्या ग्रामसभेत मान्यता मिळणार असून जिल्हा,तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवरील यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागलेली आहे.१४ व्या वित्त आयोगांतर्गत ग्रामपंचायतींना लोकसंख्या व क्षेत्रफळाच्या प्रमाणात निधी प्राप्त झालेला आहे. २०१५-२०१६ या वर्षात पालघर जिल्ह्याला या अंतर्गत कोट्यवधीचा निधी उपलब्ध झालेला आहे. मागील वर्षात अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या खात्यात पेसांतर्गत ३७ कोटीचा निधी जमा झालेला आहे. याचबरोबरीने ग्रामपंचायतींना मिळणार स्वनिधी,ग्रा. प.नी केलेल्या चांगल्या कामिगरीबद्दल शासनाकडून प्राप्त होणारी बक्षिसे, ग्रामीण रोजगार हमी योजना निधी तसेच ग्रा. पं.ना विविध स्तरातून मिळणार सी एस आर फंड अशा एकत्रीत निधींचा विनियोग कसा करावा याचा विचार ग्रामविकास आराखड्यात असणार असून गेल्या तीन महिन्यांपासून हे ग्राम विकास आराखडे बनवण्याचे काम वेगात सुरु आहे तसेच या आराखड्यावर ग्रामपंचायतस्तरापासून जिल्हास्तरीय समितीचे संपूर्ण नियंत्रण राहणार आहे.हा आराखडा प्रारूप वार्षिक व पंचवार्षिक असा असणार आहे. चार वर्षाचा बृहद आराखडा तयार करून यानंतर यात प्राधान्यक्र माने समाविष्ट असलेल्या कामांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. ही प्रकिया संपूर्ण जिल्ह्यात सुरु झालेली असून येत्या आॅगस्ट मध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत या आराखडयास मान्यता देऊन तालुकास्तरीय पंचायत समिती गणकडे तांत्रिक छाननीसाठी हा ग्राम विकास आराखडा पाठविण्यात येईल.पंचायत समिती गण हा विकास आराखडा तयार करण्यासाठी विचारात घेण्यात आला असून तांत्रिक छाननी नंतर हा आराखडा जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल व ती त्याचे परीक्षण करून निधी व नियोजनाची तालुकानिहाय एकत्रीत संक्षिप्त टिपणी करून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब करेल.हा आराखडा तयार करताना सरपंच सह उपसरपंच, सदस्यगण तसेच गावातील प्रत्येक सज्ञान व्यक्तीला नियोजनासाठी समाविष्ट केल्यामुळे ग्रामसभा सिक्र यही होणार आहेत तसेच गावपातळीवरील कामे ग्रामस्थांनी ठरावल्याप्रमाणेच होणार आहेत.