शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचा १३ ला मोर्चा

By admin | Updated: July 8, 2016 03:35 IST

पालघर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बुधवार दि. १३ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात

बोईसर : पालघर जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बुधवार दि. १३ जुलै रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार असून त्याच दिवसापासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने दिला आहे. म. रा. कर्म. संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार जिल्हापरिषद व पंचायत समित्या, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींच्या सभा घेत नसल्याने शासन, पंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पालघर जिल्हयातील ५० टक्के पेक्षाही जास्त ग्रामपंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांना किमान वेतन ही दिले जात नाही.जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या ज्या शर्तीवर व जितकी त्रैमासिक रजा दिलेली आहे तेवढी रजा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येईल अशी तरतूद करण्यात आलेली असतांनाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना रजा मिळत नाही. जर त्यांनी रजा घेतली तर त्यांचा पगार कपात केला जातो. हे अतिशय अन्यायकारक आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून होणारी दहा टक्के भरतीची यादी तयार करतांनाही अनियमितता आहेत तर अनेक ग्रामपंचातीमध्ये कर्मचारी वर्गाचे सेवा पुस्तक भरून ते अद्ययावत केलेले नसून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेचाही भरणा केलेला नाही. जर या धडक मोर्चापूर्वी समाधानकारक तोडगा निघाला नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याने पाणी पुरवठा, साफसफाई, स्वच्छता, दिवाबत्ती तसेच देखभाल दुरूस्ती इत्यादी कामांवर विपरीत परिणाम होणार आहे. याबाबत प्रशासनाची प्रतिक्रिया कोणती आहे हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. (वार्ताहर)जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हा व तालूका स्तरावर बैठका घेत नसल्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांच्या समस्या कोणाकडे मांडायच्या व त्यांची अंमलबजावणी कोणी करायची? एकंदरीत आमच्या कर्मचाऱ्यांची समस्यांची दखल संबंधीत विभागाने घेतली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या गंभीर प्रश्नासंदर्भात उदासीन धोरण असल्याने नाईलाजास्तव जिल्हयातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहून १३ जूलै रोजी धडक मोर्चा काढणार असून बेमूदत काम बंद आदोलनही सुरू करण्यात येणार आहे.- संतोष पां. मराठे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना.