शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदा पथके सज्ज...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:19 IST

संपूर्ण पालघर जिल्ह्यात मंगळवारी पारंपरिक जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. सकाळी झेंडावंदन व संध्याकाळी दहीहंडी असा दुहेरी योग अनेक वर्षांनी आल्याने तरुणाई आनंदून गेली आहे.

- राहुल वाडेकर विक्रमगड : संपूर्ण पालघर जिल्ह्यात मंगळवारी पारंपरिक जल्लोषात दहीहंडी साजरी होणार आहे. सकाळी झेंडावंदन व संध्याकाळी दहीहंडी असा दुहेरी योग अनेक वर्षांनी आल्याने तरुणाई आनंदून गेली आहे.दहीकाला मोठया उत्साहात साजरा केला जातो़ कृष्णजन्माच्या दुसºया दिवशी फोडण्यांत येणाºया दहीहांडीसाठी गेल्या काही दिवसांपासून गोविंद पथके सतत सराव करीत आहेत़ १५ आॅगस्ट रोजी होणाºया दहीकाल्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत़ मात्र दरवर्षी कृष्णजन्म आणि दहीहांडीच्या दिवशी जमके बरसणाºया पावसाने दडी मारल्यामुळे गोविंदांमध्ये तो मंगळवारी नक्कीच बरसेल असा आशेचा किरण डोकावतो आहे. यंदा डॉल्बी, डीजे नसेल त्यामुळे किमान पावसाची सर तरी यावी अशी तिची इच्छा आहे.सोमवारी साजºया करण्यांत येणाºया दहीकाला उत्सवात जिल्ह्यातील अनेक गोविंदापथके सहभागी होत आहेत़ ही पथके विक्रमगड शहरातील गेल्या अनेक वर्षापासून समित्रमंडळाच्या मार्गदर्षखाली सहभागी होत आहेत़ शहराच्या संख्येने ग्रामीण भागात गोविंदा पथकांची संख्या कमी आहे़ यंदा हा दहीकाला उत्सवालाही महागाईची झळ बसलेली आहे़ दहीहांडीसाठी लागणारी हंडी पूर्वी ५० रुपयाला मिळत होती आता तिचे दर आकारनुसार ५०० रुपयांपर्यंत भिडले आहेत. तर फळांच्या-फुलांच्या किंमतही भरमसाट झाल्या आहेत. श्रावण महिना असल्याने महिनाभर असे अनेक सण, उत्सव येत असतात व हा उपवासाचा महिना असल्याने फळांच्या व फुलांची मागणी वाढलेली आहे़ अशाही परिस्थितीत अनेक दहीकाला उत्सव मंडळांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो़ मात्र पावसाचा जोर कसा राहील या चिंतेत गोंविदा पथके आहेत़ कारण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.आजही तेवढ्याच भक्तीभावाने सण,उत्सव एकत्ररित्या जोपासले जातत़ त्याचाच एक भाग कृष्ण जन्म उत्सव,दहीहंडी हा पारंपारिक पध्दतीने साजरा केला जातो. विक्रमगड व परिसरात साºया तालुक्यात जवळ जवळ १०० ते १५० मंडळे आपल्या गाव-खेडयापाडयात व शहरात बांधलेल्या हंड्या फोडून मोठा जल्लोशात आनंद व्यक्त करीत असतात़ ग्रामीण भाग असला तरी येथेही मोठया रकमेची बक्षिसे लावून दहीहांडी उत्सव साजरा न करिता सर्वांनी एकत्र जमून एकोप्याने एकच दहीहांडी बांधायची व ती फोडण्याचा चान्स सर्वांना देवून आनंदाने पारंपारिक पध्दतीनेच हा उत्सव आजही चालू आहे़तालुक्यात जवळ जवळ २०० ते ३०० हंड्या बांधल्या जातात़ या भागात जास्तीत जास्त तीन ते चार थरापर्यतच हंडयांची उंची असून सुरक्षिततेच्या कारणास्तव उंच हंड्याच बांधल्या जात नाही़ अलीकडच्या आधुनिग युगामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे अनेक विविध बदल झालेले आहेत़ त्यानुसार जरी पारपंरिक पध्दत जपली जात असली तरी त्यास आधुनिक युगाची थोडीफार का होईना सांगड घातली जातेच लग्न समारंभ,वाढदिवस,इतर कार्यक्रमांना डीजेची मोठी मागणी असते व आता ही फॅशन व प्रतिष्ठेचा प्रश्न मानला जात असल्याने त्याची मागणीही मोठी झाली आहे़ त्यानुसार आता दहीहांडीलाही डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई आज ग्रामीण भागातही पहावयास मिळते. परंतु यंदा त्यावर बंदी आहे. ग्रामीण भागातील गोविंदा मंडळे दुसºया गावातील दहीहांडया फोडण्यासाठी न जाता आप-आल्याच गावात हा उत्सव साजरा करतात़पूर्वी विक्रमगड शहरात साºया गाव-पाडयांतील जनता दहीहंडी पाहाण्यासाठी येत होती मात्र आता सर्वच गावात व खेड्यापाड्यात दहीहंडी उत्सव साजरा करत असल्याने काहीशा प्रमााणात विक्रमगड शहरातील गर्दी ओसरु लागली आहे़काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने मंगळवारी अशीच परिस्थिती राहाण्याची शक्यता असल्याने या दिवशी मिळेल त्या घरातून पाण्याचा वर्षाव केला जातो हंड्या सजविण्यासाठी मंडळ खबरदारीची भूमिका घेत असतात. पोलिसांनीही हा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सूचना केल्या आहेत़