शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सरकार नवउद्योजकांच्या पाठीशी - अनंत गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 04:14 IST

देशातील तरुण हे रोजगार मागणा-यांऐवजी रोजगार देणारे व्हायला हवेत. यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक होण्याची गरज आहे.

वाडा : देशातील तरुण हे रोजगार मागणा-यांऐवजी रोजगार देणारे व्हायला हवेत. यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योजक होण्याची गरज आहे. याकरिता सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी पत्रकारांशी बोलताना केले. हमरापूर येथील नव्याने उभारण्यात आलेल्या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी ते रविवारी आले होते. या वेळी आमदार भरत गोगावले, सद्गुरू दादासाहेब मोरे महाराज, शिवसेनेचे महाड विधानसभा संपर्क संघटक सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य भारती कामडी, हमरापूर ग्रामपंचायतचे सरपंच संदीप गोवारी, उपसरपंच गजानन पाटील हे उपस्थित होते.उद्घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र सरकार स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसाह्य दिले जात आहे. पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्याचा औद्योगिकीकरणाद्वारे विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. या भागात उद्योग उभारणाºया उद्योजकांच्या पाठीशी सरकार उभे आहे. स्टार्ट अप इंडिया आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून नवउद्योजकांना कारखाने उभारण्याची दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सरकार करीत आहे. उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून पालघरसारख्या आदिवासी जिल्ह्यातील रोजगाराच्या प्रश्नावर निश्चितपणे मात करून दारिद्र्य दूर करता येईल, असेही गीते यांनी सांगितले.