लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : समुद्रीकासव आणि वन्य जीव संवर्धनाविषयी जनजागृतीकरिता रविवार १४ मे रोजी चित्रपट अभिनेत्री आलिया भटने डहाणूला भेट दिली. पारनाका येथील उपवन संरक्षक कार्यालयात स्लाईड शोद्वारे माहिती घेतल्यानंतर कासव पुनर्वसन केंद्राची तिने पाहणी केली. या वेळी मोठ्यासंख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.मुख्य वन संरक्षक ठाणे सुनील लिमये आणि उपवन संरक्षक डहाणू एन. लडकत यांनी पुष्प देऊन आलियाचे स्वागत केले. त्यानंतर पशुवैद्य दिनेश विन्हेरकर यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून वाईल्डलाईफ कनझरवेशन अँड अनिमल वेल्फेअर असोसीएशन या संस्थेचे वन्यजीव संवर्धनातील कार्य, समुद्री कासव व त्यांचे प्रकार या विषयी माहिती घेतली. राज्यातील एकमेव पुनर्वसन केंद्राची पद्धती जवळून पाहिली. त्यानंतर दुपारी समुद्रकिनारी जाऊन रेस्क्यू करण्यात आलेल्या कासवाला पाण्यात सोडले. या वेळी डहाणूतील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. त्यांना कासव व वन्य जीव संवर्धनासाठी आवाहन केले.
कासवाला आलियाचा अलविदा...
By admin | Updated: May 14, 2017 22:44 IST