शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडच्या मोगऱ्याला मुंबईत चांगला भाव

By admin | Updated: September 2, 2016 03:33 IST

यंदा बहर कमी असल्याने येथील सर्व मोगरा मुंबईच्या बाजारात जात असून त्याचा भाव ४०० ते ५०० रुपये किलो आहे. रविवार पासून तो उत्पादन कमी व मागणी जास्त यामुळे

- राहुल वाडेकर,  विक्रमगडयंदा बहर कमी असल्याने येथील सर्व मोगरा मुंबईच्या बाजारात जात असून त्याचा भाव ४०० ते ५०० रुपये किलो आहे. रविवार पासून तो उत्पादन कमी व मागणी जास्त यामुळे ८०० ते १००० किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे या तालुक्यातील मोगरा सध्या मोठ्या प्रमाणावर जात आहे. खांडव अंतर्गत गावपाडयातील १०० ते १५० शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये मोगरा लागवड मोठया प्रमाणावर केली असून हंगाम जरी कमी असला तरी रोज एका एकरमध्ये अर्धा ते एक किलो मोगरा कळी काढली जाते आहे़ मात्र येथे स्थानिक बाजरपेठ नसल्याने व योग्य भावमिळत नसल्याने हा माल सध्या मुंबईच्या बाजारात जातो आहे. बहर कमी असल्याने तसेच भाद्रपद असल्याने या फुलांची मागणी वाढली आहे़ त्यामुळे उन्हाळयांत ८० ते ९० रुपये किलो विकला जाणारा मोगरा ४०० ते ५०० रुपये किलोने विकला जातो आहे. गौरीगणपतीच्या काळात हाच मोगरा ७००, ८०० व १००० किलो रुपये पर्यत जाण्याची शक्यता असल्याचे येथील शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलतांना सांगीतले़येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळ्यात भातलागवड तर उन्हाळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यात फुलशेती मोठया प्रमाणात करू लागले आहेत. यावर्षी तालुक्यात हंगामा नुसार नविन लागवडीत ३६० हून अधिक हेक्टर वर भाजीपाला लागवड करण्यांत आलेली आहे. त्याच बरोबर फुलांची ही लागवड शेतकऱ्यांनी केली आहे़ गेल्यावर्षीही अंदाजीत ३० हेक्टरवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी फुलशेती केली होती व यंदा हा लागवडीचा आकडा वाढता आहे़.तालुक्यातील विविध भागातील मोगरा बहर कमी जास्त होत असतो़ थंडी व पावसाळी हंगामामध्ये उत्पादनात घट होते तेच उन्हाळी हंगामामध्ये बहरत असते़ त्यामुळे उत्पादनानुसार उन्हाळयात कवडीमोल भावाने विकावी लागते तर पावसाळी व हिवाळी हंगामध्ये मोगरा कळीला चांगला भाव मिळत असतो़साधारण सिझनमध्ये एक एकर जमीनीमध्ये लागवड केलेली मोगराकळी तोडण्याकरीता पाच ते सहा लोक पहाटे ५ वाजल्यापासून ते दुपारी ११ वाजेपर्यत खपतात. ते जवळजवळ ८ ते १० किलो मोगरा कळीची तोड करतात़ सर्व गावातील शेतकरी मिळून दलालाला मोगरा विक्री करतात़