शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘मुलींचा जन्मदर चांगला, पण शाळाबाह्य मुलींचे प्रमाण जास्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 00:57 IST

ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली रोजगारानिमित्त बाहेर पडताना लग्न करीत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढीस लागल्याची खंत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पालघर : जिल्ह्यात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढत असल्याचे समाधान असले तरी शाळाबाह्य मुलींचे वाढते प्रमाण पाहता जिल्ह्यात ‘बेटी बचावपेक्षा बेटी पढाव’ची जास्त आवश्यकता असल्याने महिलांनी पुढे येण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, संदीप पवार, संदीप कळंबे, जिल्हा विधी अधिकारी ॲड. मनीषा पाटील आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली रोजगारानिमित्त बाहेर पडताना लग्न करीत असल्याने जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण वाढीस लागल्याची खंत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सीएसआर फंडातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगून ग्रामपंचायतीचा कारभार महिलांच्या हातात दिल्यास कारभारात नक्कीच सुधारणा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच मुलगा झाल्यावर पेढा आणि मुलगी झाल्यावर बर्फी वाटणे हा समज दूर करून एक मुलगीच आई-वडिलांना चांगल्या पद्धतीने सांभाळ करू शकते, असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित जिल्हा विधी अधिकारी मनीषा पाटील यांनी, जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांनी एका दिवसासाठी एकत्र येण्याऐवजी वर्षाचे ३६५ दिवस एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत समाज काय म्हणेल, याकडे लक्ष देण्याऐवजी निर्णय घ्या आणि पुढे या, असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थिनींना एका दिवसाचे अधिकारीपद

जव्हार : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या अंतर्गत वस्तिगृहात शाळकरी मुली व कॉलेज कुमारींना महिला दिनाचे औचित्य साधून श्रेणी-२ च्या पाच अधिकाऱ्यांची जबाबदारी देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना एका दिवसाचे मानधनही देण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यालयात साहाय्यक प्रकल्प अधिकारी श्रेणी-२ साठी शासकीय मुलींचे वसतिगृह येथील दोन विद्यार्थिनींना साहाय्यक प्रकल्प अधिकारी, तर एक नियोजन अधिकारी, एक कार्यालयीन अधीक्षक, तर एक लेखा अधिकारी अशा पाच विद्यार्थिनींना एका दिवसाकरिता कार्यालयीन आदेश देऊन एक वेगळी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तूही देण्यात आली. दरम्यान, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सामाजिक दृष्टीने कशा प्रकारे काम करीत असते, या कार्यालयाकडून आदिवासींचे जीवन उंचावण्यासाठी कशा प्रकारे योजना राबविण्यात येतात हे या मुलींना शिकविण्यात आले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार