शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

देव तारी त्याला कोण मारी...विजेचा धक्का लागून ‘ती’ तडफडत होती, ‘ते’ आले देवदूत बनून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2023 07:24 IST

त्रिशा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शिकवणीसाठी पायी माहीम फणसबाग येथे जात होती.

पालघर : पालघर तालुक्यातील माहीम येथे खासगी शिकवणीला जाणाऱ्या माहीम-टेंभी येथील त्रिशा मेहेर या तिसरीतील विद्यार्थिनीला विजेचा धक्का लागून ती मृत्यूशी झुंज देत होती. त्याचवेळी सुहास म्हात्रे, चैतन्य वर्तक या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत तिचे प्राण वाचविले. त्रिशावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून  तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्रिशा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शिकवणीसाठी पायी माहीम फणसबाग येथे जात होती. यावेळी रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात पडलेल्या वीजवाहक तारेचा स्पर्श होऊन तिला जबर धक्का बसला. त्यानंतर ती रस्त्यावर तडफडत होती. तिच्या सोबतच्या मुलांनी घाबरून पळ काढला. यावेळी सुहास म्हात्रे यांनी तेथे धाव घेतली. प्रथम विजेच्या खांबाला लावण्यात आलेल्या फ्यूज बॉक्समधील सर्व फ्यूज काढले. परिसरातील सर्व विद्युत प्रवाह खंडित केल्याचे सुहास यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

तरुणांच्या धाडसाचे कौतुकत्यांच्यासोबत असलेल्या चैतन्य वर्तक याच्या साथीने त्यांनी रस्त्यात वीज तारांच्या विळख्यात अडकलेल्या त्रिशाला उचलून घेतले. तिच्या हात आणि पायाला जखमा झाल्या होत्या. दोघांनी तिला डॉक्टरकडे नेले व प्रथमोपचार केले. त्यानंतर माहीम प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीप्ती गायकवाड यांनी सांगितले. वेळीच प्रसंगावधान दाखवीत त्रिशाचे प्राण वाचविणाऱ्या सुहास म्हात्रे, चैतन्य वर्तक यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.