शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासात घ्या, योग्य मोबदला द्या

By admin | Updated: July 30, 2015 22:51 IST

केंद्र सरकारच्या वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी ठाणे व पालघर जिल्ह्या त मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वसईतील स्थानिक भूमीपुत्रांच्या जमीनी

वसई : केंद्र सरकारच्या वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोरसाठी ठाणे व पालघर जिल्ह्या त मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे वसईतील स्थानिक भूमीपुत्रांच्या जमीनी मोठ्या प्रमाणात रेल्वेकडून संपादीत होणार आहेत. हे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक भूमीपुत्रांनी एकत्र येऊन यासंदर्भातील आपले म्हणणे कोकण आयुक्त कार्यालयाला सादर केले आहे.२००९ पासून या प्रकल्पासाठी जमिनी संपादन करण्याचा प्रयत्न विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. परंतु या कामी स्थानिक भूमीपुत्रांचा विरोध मोठ्या प्रमाणात होत असल्याने हे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे. या प्रकल्पामुळे हजारो भूमीपुत्र विस्थापित होणार असून त्यांच्या सुपीक जमीनी या प्रकल्पात जात आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे. मध्यंतरीच्या काळात भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमीनीचा मोबदला त्वरीत स्वीकारा अन्यथा आम्ही जमिनी ताब्यात घेऊ अशा नोटीसा बजावल्यामुळे ग्रामीण भागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये संबंधीत अधिकाऱ्यांनी बाधीत शेतकरी मोबदला घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणल्यानंतर न्यायालयाने बाधीत शेतकऱ्यांची नवतरूण मित्रमंडळ या संघटनेला कोकण आयुक्तांसमोर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले. त्यानुसार या संघटनेने नुकतेच आपले म्हणणे लेखी स्वरूपात कोकण आयुक्तांना सादर केले आहे. (प्रतिनिधी)या प्रकल्पामुळे हजारो भूमीपुत्र विस्थापित होणार आहेत तसेच देण्यात येणारा मोबदलाही पुरेसा नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यापूर्वी स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन कार्यवाही करणे गरजेचे होते परंतु भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवत सर्वेक्षण केले व नोटीसा बजावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विकास प्रकल्पांसाठी स्थानिकांना विस्थापित करायचे, याबाबत स्थानिकांत नााजी आहे.