शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गौरींच्या आगमनासाठी विक्रमगड बाजारात खरेदीची गर्दी

By admin | Updated: September 8, 2016 02:14 IST

लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी, असे म्हणत घरोघरी गौरीचे आगमन होत असल्याने विक्रमगडच्या बाजारात फुले, फळे, भाज्या खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची एकच

विक्रमगड : लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी, असे म्हणत घरोघरी गौरीचे आगमन होत असल्याने विक्रमगडच्या बाजारात फुले, फळे, भाज्या खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची एकच झुंबड उडाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर गणपती आगमन झाल्याने व गौरीच्या आगमनाची तयारी यामुळे बाजारही गर्दीने फुलून गेला आहे.गौरीच्या सजावटीसाठी लागणारे दागिने, मुखवटे, चोळी-साडी साजशृंगाराचे सामान, वेणी, फुलांचे दागिने, १६ प्रकारच्या भाज्या, सून, ओटीचे सामान आदी खरेदीसाठी महिलांनी सकाळपासूनच बाजारात गर्दी केली होती. सणांचे औचित्य आणि वाढत्या मागणीमुळे भाव गगनाला भिडले आहेत. गणपतीच्या आगमनानंतर लगेचच येणाऱ्या गौरीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी विक्रमगडमधील महिला सज्ज झाल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात विविध प्रकारे गौरीपूजन केले जाते. उद्या तालुक्यातील विविध ठिकाणी गौरीच्या मूर्तीची, मुखवट्याची स्थापना करण्यात येणार आहे. तालुक्यातील गावामध्ये आदिवासी लोक तेरड्याच्या फुलांनी गौरीला सजवून पारंपरिक नृत्य करुन गौरीची स्थापना करतात. येथील शहरी भागात गौरीसाठी तसेच कोळी समाजामध्ये खेकड्यांचा किंंवा माशांचा नैवेद्य दाखविला जातो. दरम्यान, गौरी पूजनाच्या साहित्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्कयांनी भाववाढ झाली असल्याचे महिलावर्गाकडून सांगण्यात आले. मात्र, वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर लोक खर्च करीत आहेत.